बाभळी कॉलींग ही या दशकातील महत्वाची कादंबरी - प्रा. डॉ. रणधीर शिंदे
Satara News : समकाळातील गावगाड्याचे महाभारत टिपणारी 'बाभळी कॉलींग' ही या दशकातील महत्वाची कादंबरी आहे, असे मत प्रसिद्ध समीक्षक प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी व्यक्त केले.
निलेश महिगावकर यांच्या 'बाभळी कॉलींग' कादंबरीच्या द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन समारंभ शुक्रवारी व्यंकटेश माडगूळकर यांच्या जयंतीदिनी येथील नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये इर्जिक प्रकाशनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. रणधीर शिंदे बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ विचारवंत मा. किशोर बेडकिहाळ यांनी भूषवले.
विनोद कुलकर्णी यांचा सत्कार
या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने, प्रसिद्ध वक्ते प्रा. निरंजन फरांदे यांची प्रमुख ऊपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकार विनोद कुलकर्णी यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी कादंबरीचे भाषासौष्ठव ऊलगडले. तसेच काही दाखले दिले. या दहा - पंधरा वर्षातली जातवास्तव व राजकारण टिपणारी ही महत्वाची साहित्यकृती असल्याचे त्यांनी नमूद केले.
बाभळी हा दुष्काळाचा कोलाज
बाभळी हा दुष्काळाचा कोलाज आहे असे मत ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र माने यांनी मांडले, तर निलेश महिगावकर हा समकाळातला, सातारी भाषेवर प्रभुत्व असलेला महत्वाचा लेखक असल्याचे मत विनोद कुलकर्णी यांनी मांडले. या निमित्ताने लेखक निलेश महिगावकर यांनीही आपल्या कादंबरीमागची भूमिका विषद केली.
या कादंबरीच्या द्वितीय आवृत्तीत प्रा. निरंजन फरांदे यांचा विस्तृत समिक्षालेख असून, ही कादंबरी भविष्यात ईतिहास घडवेल,असा आशावाद त्यांनी या निमित्ताने व्यक्त केला.
कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास कवी प्रमोद कोपर्डे, व्याख्याते श्रीधर साळुंखे, पत्रकार सुनिल शेडगे, रंगकर्मी चंद्रकांत कांबीरे, कवयित्री कांता भोसले, अभिनेते पंकज काळे, संदीप बोर्गे, वीरधवल पाटील, शिक्षक तानाजी मालुसरे, इर्जिक प्रकाशनचे हरिश्चंद्र भोसले, दिग्दर्शक गिरीश पाटील, प्रा. संभाजी थोरात, बाबुराव शिंदे, गजानन चेणगे, विठ्ठल भोसले, आल्पेश खरात, दीपक पवार, आनंद भुतकर, अमित परिहार आदि मान्यवर उपस्थित होते.
सातारी भाषेतील दणकट गद्यकथन
'बाभळी कॉलींग' या कादंबरीचा कथनावकाश हा माणदेशाच्या ओसाड माळरान भूमिपरिसराने विनटलेला आहे. तसेच हे सातारी भाषेतील दणकट गद्यकथन आहे. या गद्यभाषेस एक वाहती गद्यलय आहे. समकालीन गावगाड्याचे महाभारत टिपणारी या दशकातील ही महत्त्वाची कादंबरी आहे.
- प्रा. डॉ. रणधीर शिंदे
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या