तरूण भारतमधील मंदार कोल्हटकर व धीरज पाटील काळाच्या पडद्याआड
Satara News : पुणे ते बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर जोशीविहिर (ता. वाई) येथे झालेल्या भीषण अपघातात मंदार कोल्हटकर (वय ४५, रा. कोल्हटकर आळी, सातारा) व धीरज पाटील (वय ३८, रा. ढवळी, ता. वाळवा, जि. सांगली) हे जागीच ठार झाले. हे दोघे तरुण भारतच्या सातारा कार्यालयात वितरण विभागात कार्यरत होते.
मंदार कोल्हटकर व धीरज पाटील हे आपल्या दुचाकीवरुन रस्त्याच्या डावीकडून साताऱ्याच्या दिशेने येत होते. त्याचवेळी पुण्याहून कोल्हापूरकडे निघालेल्या विजय शहा (रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) यांच्या गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती, की दोघेही उडून अतिशय दूर फेकले गेले.
सीसीटीव्हीत अपघाताची घटना कैद
महामार्गाच्या बाजूला असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली असून क्वीड कार ही महामार्गावरील मधली लेन सोडून डाव्या लेनमध्ये येत हा अपघात झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. यावरुनच क्वीड कार चालक अनियंत्रित असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. ही दुर्घटना गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास झाल्याचे वृत्त आहे.
अपघाताची माहिती मिळताच सातारा जिल्हा रुग्णालय परिसरात तरुण भारत परिवारातील सदस्य, पत्रकार तसेच साताऱ्याच्या नाट्याक्षेत्रातील अनेक कलाकार यांनी गर्दी केली होती.
मंदारचे नाट्य क्षेत्रात योगदान
साताऱ्याच्या नाट्य क्षेत्रात मंदार कोल्हटकर यांचे योगदान होते. त्याने काही चित्रपट, मालिका, नाटके तसेच जाहिरातींसाठी अभिनय केला होता.
मंदार कोल्हटकर यांच्या पश्चात आई वैजयंती, पत्नी मयुरा, दोन मुले मितेश आणि मिहीर असा परिवार आहे. धीरज पाटील यांच्या पश्चात वडील बाळासो, आई उषाताई असा परिवार आहे.
मंदार कोल्हटकर यांचा अंत्यविधी शुक्रवार दि. १९ रोजी संगममाहुली येथे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तर धीरज पाटील यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम ढवळी या ठिकाणी होणार आहे.
उदयनराजे यांच्याकडून सांत्वन
या दोघांच्या अपघाती मृत्यूमुळे तरुण भारत परिवार, साताऱ्यातील नाट्यकर्मी व वृत्तपत्र कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांनी रात्री जिल्हा रुग्णालयात येऊन दोन्ही परिवारांची भेट घेऊन शोकभावना व्यक्त केली व त्यांचे सांत्वन केले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या