उदयनराजेंना विजयी करण्याचे आवाहन; श्रमिक आघाडीचा पाठिंबा जाहीर
Satara News : छत्रपतींच्या गादीचा मानमरातब सांभाळण्याची जबाबदारी सातारकरांची असल्याचे सांगत, येथून उदयनराजे यांना विजयी करून गादीचा सन्मान राखा असे आवाहन राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष, कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी केले आहे.
सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा उदयनराजे यांना पाठिंबा जाहीर केला. उदयनराजे यांना मतदान करून त्यांना विजयी करण्याचे आवाहन आपण या मतदारसंघातील शिरवळ, लोणंद, सातारा, कराड येथील उद्योग क्षेत्रातील कामगारांना केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
राजांची कॉलर टाईट ठेवा
मध्यंतरी सातारा येथील पत्रकार परिषदेवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उदयनराजे यांचा विषय आला तेव्हा उदयनराजे यांच्याप्रमाणे कॉलर उडवली होती. तो संदर्भ देत, ही राजांची कॉलर आहे, ती टाईट ठेवा, पडू देऊ नका असा संदेशच त्यांनी दिला होता असे आपल्याला वाटते असे ते म्हणाले.
बिनविरोधच निवडून द्यायला हवे होते !
सातारा ही छत्रपती शिवरायांची गादी असल्यामुळे येथील लढतीकडे देशासह जगाचे लक्ष आहे. वास्तविक उदयनराजे यांना बिनविरोधच निवडून द्यावे अशी माझ्यासह जनतेचीही इच्छा होती. आता येथील 80 टक्के जनतेने त्यांना विजयी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.
Satara Loksabha constituency, Udayanraje Bhosale, BJP candidate
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या