सातारा येथील मेळाव्यात नितीन बानुगडे - पाटील यांचे आवाहन
Satara News : सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांना मताधिक्क्य देण्यात शिवसेनेचा सहभाग महत्त्वाचा राहील असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते व पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे - पाटील यांनी येथे निर्धाराने सांगितले.
सातारा येथील नरिमन हॉल या ठिकाणी गुरुवारी आयोजित केलेल्या सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. सातारा जिल्ह्यात शिवसेनेचे मजबूत संघटन असून प्रत्येक शिवसैनिक गावागावात आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडत आहे असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.
धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ
केंद्र व राज्य सरकारच्या दडपशाहीमुळे सर्वसामान्य माणूस पेटून उठला असून गद्दारांविषयी जनतेत प्रचंड रोष आहे. त्यांना धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ आहे असे सांगत, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी शिवसैनिकांनी जीवाचे रान करायचा निश्चय केला आहे, असे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यावेळी म्हणाले.
याप्रसंगी तेजस शिंदे, सुधीर राऊत, माऊली पिसाळ, सुनंदा महामुलकार, रामदास कांबळे, नंदू घाडगे, यशवंत घाडगे, सखाराम पारटे, अजित यादव, विश्वनाथ धनावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray), Satara Loksabha constituency, Nitin Banugade Patil
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या