Satara News : जीवे मारण्याच्या प्रयत्नप्रकरणी शिक्षा


बायकोकडे बघण्या - बोलण्यावरून जाब विचारल्याने चिडून कृत्य 

Satara News : 'तू दारू पिऊन माझ्या बायकोकडे का बघतोस ? तिच्यासोबत का बोलतोस ?' असे विचारल्याच्या कारणावरून चिडून जाऊन जीवे मारण्याच्या उद्देशाने एकाला चाकूने भोसकल्याप्रकरणी दोषी धरून न्यायालयाने आरोपीला ३ वर्ष साधी कैद व २० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

लक्ष्मण धनंजय पाटील (वय ३८, रा. कारंडवाडी, ता. जि. सातारा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. दि. ११ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विजय हरी भोसले (रा. गौरीशंकर कॉलेजजवळ, देगाव, ता. जि. सातारा) याने लक्ष्मण यास आपल्या बायकोकडे बघण्या - बोलण्यावरून जाब विचारल्याने चिडून जाऊन आपल्या टपरीतील चाकू घेऊन, 'तुला आता सोडत नाही, तुला जिवे ठार मारुन टाकतो' असे म्हणून पोटात भोसकले. या हल्ल्यात ते जखमी झाले. 

तीन वर्षांची कैद व दंड 

याप्रकरणी जखमीच्या पत्नीने सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक  ए. एस. चौधरी यांनी करुन न्यायालयात दोषारोप पत्र पाठवण्यात आले होते.

हा खटला तिसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एच. जाधव यांच्या कोर्टात चालला होता. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता फिरोज शेख यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. या खटल्यात एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. केवळ परिस्थितीजन्य पुरावा व अन्य साक्षीदारांच्या साक्षीवरून तसेच अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यांचा युक्तीवाद व आरोपीने केलेल्या कृत्याबाबत उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे यांचे दाखले न्यायालयात सादर केल्याने समोर आलेला पुरावा ग्राह्य मानून न्यायाधीशांनी आरोपीस ३ वर्ष साधी कैद व २० हजार रुपये दंड, दंड न दिल्यास ६ महिने साधी कैद तसेच कलम ५०६ अन्वये ३ महिने साधी कैद अशी शिक्षा दिली आहे. दंडाची रक्कम जखमीस अदा करण्यात यावी असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

सातारा तालुका पोलिसांकडून तपास 

याकामी पोलीस उपअधीक्षक राजीव नवले, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार शीतल भोसले यांनी कामकाज पाहिले. पोलीस प्रॉसिक्यूशन स्क्वॉडचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल सावंत, सहाय्यक फौजदार शशिकांत गोळे, पोलीस हवालदार गजानन फरांदे, रहिनाबी शेख, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र कुंभार, अमित भरते यांनी परीश्रम घेतले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या