उदयनराजे यांनी केली जागेची पाहणी; एक लाखांची आसनव्यवस्था
Satara News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ३० एप्रिल रोजी कराड येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या जागेची पाहणी आज खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, डॉ. अतुल भोसले, मोहनराव जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सागर शिवदास आदी उपस्थित होते. मोदींच्या सभेसाठी सुंदर ठिकाण निवडलेले आहे. सभेसाठी एक लाख लोकांची आसनक्षमतेचा भव्य मंडप उभारण्यात येणार आहे.
तयारीच्या अनुषंगाने उपाययोजना
मागील निवडणुकीत मोदींची सभा सातारा शहरात झाली होती. मात्र या निवडणुकीत मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांचा विचार करून कराडमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेच्या तयारीच्या अनुषंगाने उद्यापासून उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत. या ठिकाणी असलेले एमएसईबीचे पोल शिफ्ट करावे लागणार आहेत. वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. हेलिपॅडसाठी देखील याच ठिकाणी व्यवस्था असेल. याबाबतच्या योग्य त्या सूचना प्रशासनाला करण्यात आल्या आहेत.
भ्रष्टाचारावर आवाज उठवण्यात चूक काय ?
दरम्यान, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील घोटाळ्यांबाबत वारंवार आरोप होत आहेत. विकासाच्या मुद्द्यावर चर्चा का होत नाही असे पत्रकारांनी छत्रपती उदयनराजे यांना विचारले असता, कोरेगावचे आमदार महेश शिंदे आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी जे आरोप केले आहेत, ते न्यायालयीन निर्णयावर आधारित आहेत. भ्रष्टाचाराच्या घटनांवर आवाज उठवणे हे लोकप्रतिनिधींचे कामच आहे. तर चुकलं काय असा सवाल त्यांनी केला.
PM Narendra Modi, Udayanraje Bhosale, BJP, RALLY IN KARAD
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या