Satara News : चोपडी उघडायला लावू नका


किशोर सोनवणे प्रकरणावरून प्रभाकर देशमुख यांचा गर्भित इशारा

Satara News : आमच्याकडेही विरोधकांच्या गुन्ह्यांची चोपडी आहे. आम्हाला ती चोपडी उघडायला लावू नका, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माण - खटावचे नेते प्रभाकर देशमुख यांनी दिला आहे.

पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे यांच्यावर म्हसवड पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल केला गेला. या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. आमच्याकडे विरोधकांची सर्व माहिती आहे. मात्र आम्ही त्यांच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला नाही. जेव्हा आपण दुसऱ्यावर आरोप करतो, त्यांच्यावर गुन्हे दाखल करतो तेव्हा आपल्याही कार्यकर्त्यांचा त्यामध्ये बळी जाऊ शकतो हे त्यांनी एक लक्षात घ्यावे, असा गर्भित इशारा त्यांनी यावेळी दिला.

पोलीस व नेत्यांची मिलीभगत

वास्तविक किशोर सोनवणे यांच्यावर हा गुन्हा दाखल करून विरोधकांनी आपली दडपशाही दाखवून दिली आहे. मात्र प्रशासनाने व पोलिसांनी राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून गुन्हे दाखल करण्यापूर्वी व्यवस्थित माहिती घ्यायला पाहिजे होती, असे सुनावत, सोनवणे यांच्यावरील गुन्हा म्हणजे प्रशासन, पोलीस व राजकीय नेत्यांची मिलीभगत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

वास्तविक, एखाद्या प्रकरणात चूक झाली असेल तर त्याच्याविरोधात किमान दोन वर्षांत तक्रार पोलिसांत दाखल केली जाऊ शकते एवढा कायदा आम्हालाही कळतो. मात्र २०१७ ते आज २०२४ म्हणजे जवळपास ७ वर्षांनी सोनवणे यांच्यावर गुन्हा कसा काय दाखल होऊ शकतो ? प्रशासनानेही हा गुन्हा दाखल करताना कायदा काय सांगतो हे तपासले नाही का? पोलिसांनीही केवळ राजकीय दबावापोटी हा गुन्हा दाखल केला आहे काय? या सर्वांची उत्तरे प्रशासनाला व पोलिसांनाही द्यावी लागतील असे ते म्हणाले.

पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा 

पोलिसांनी व प्रशासनानेही कोणा राजकीय नेत्याच्या सांगण्यावरून एखाद्यावर गुन्हा दाखल करू नये. प्रकरणाची सत्यता तपासावी यासाठी आम्ही कार्यकर्त्यांसमवेत म्हसवड पोलीस ठाण्यास भेट देऊन सहायक पोलीस निरीक्षक यांना भेटलो असून या गुन्ह्याविषयी चर्चा केली आहे, असेही शेवटी देशमुख यांनी सांगितले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या