Satara News : फलटणमध्ये २ पिस्टल हस्तगत


फलटणमध्ये कोंबिंग ऑपरेशनदरम्यान एलसीबीची धडाकेबाज कारवाई

Satara Crime News : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा पोलिसांकडून फलटणमध्ये राबवल्या जात असलेल्या कोंबिंग ऑपरेशनदरम्यान मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करून २ देशी बनावटीची पिस्टल, २ जिवंत काडतुसे, मोटार सायकल असा २ लाख ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. गणेश बारकू वाळके (वय २८, रा. बोरगाव तारू, ता. भोकरदन, जि. जालना) असे आरोपीचे नाव आहे.

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यामुळे सातारा पोलीस अधिक सतर्क झाल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. निवडणूक प्रक्रिया निर्विघ्न पार पडावी यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन राबवून पोलीस अभिलेखावरील आरोपी व अन्य संशयित इसमांची तपासणी करून प्रभावी कार्यवाही करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिल्या आहेत.

टीप मिळाली, ट्रॅप लागला

यानुसार  सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदारांचे पथक तयार करुन फलटणमध्ये कोंबिंग ऑपरेशन राबवले जात होते. यादरम्यान, फलटण शहरातील अलगुडेवाडी हद्दीत बोरावके वस्तीजवळ फलटण - बारामती रस्त्याने एक इसम मोटरसायकलवरून (एमएच ११ सीएल २९९७) गावठी बनावटीचे पिस्टल विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांच्या विश्वसनीय बातमीदारामार्फत मिळाली. त्याप्रमाणे बोरावके वस्तीजवळ रात्री साडेअकराच्या सुमारास संशयिताला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे २ देशी बनावटीची पिस्टल, २ जिवंत काडतुसे व हिरो मोपेड असा मुद्देमाल मिळून आला. त्याच्याविरुध्द फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, मदन फाळके, तानाजी माने, पोलीस अंमलदार सुधीर बनकर, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, हसन तडवी, सनी आवटे, मुनीर मुल्ला, अजय जाधव, अमित झेंडे, मनोज जाधव, राजू कांबळे, धीरज महाडीक, मोहसिन मोमीन, अमृत कर्पे यांनी ही कारवाई केली. 

दीड वर्षात ७८ पिस्टल जप्त

सातारा जिल्ह्यात अवैध शस्त्रांच्या संदर्भात चिंताजनक परिस्थिती असून जिल्हा पोलिसांनी अवैध शस्त्रांचे अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. नोव्हेंबर २०२२ पासून गेल्या दीड वर्षात ७८ देशी बनावटीची पिस्टल, ३ बारा बोअर रायफल, १८५ जिवंत काडतुसे व ३७७ रिकाम्या पुंगळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

Trap in Phaltan, Satara LCB, Satara police, Satara SP Sameer Shaikh, Additional SP Anchal Dalal

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या