Satara News : निवडणुकीचा प्रचार घसरला 'लायकी'वर


शरद पवारांविषयी बोलताना गेला तोल; मिळाले बिनतोड प्रत्त्युत्तर 

Satara News : सातारा येथे आज शरद पवार यांच्याविषयी बोलताना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांची जीभ घसरली. यशवंत विचारांवर बोलण्याची शरद पवार यांची लायकी नाही असे वक्तव्य त्यांनी केले. त्यावर, बापाला विसरण्याची प्रवृत्ती काही लोकांमध्ये असते, त्यामुळे त्यांच्याकडून काही अपेक्षा करण्यात अर्थ नाही अशा शेलक्या शब्दात सातारचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी त्यांचा समाचार घेतला.

राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्यावर प्रेम करणारा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याची ओळख आहे. हा जिल्हा गेली २५ वर्षे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिल्याने या समीकरणाला छेद देण्याच्या ईर्श्येतून बोलताना महायुतीच्या नेत्यांचा तोल जात असल्याचे महेश शिंदे यांच्या वक्तव्यावरून दिसून आले. 

यशवंत विचारांचा विसर पडला

आज शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी उदयनराजे यांच्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर टीका करताना ते शरद पवार यांच्यावर घसरले. शरद पवार यांना यशवंत विचारांचा विसर पडला असून यशवंत विचारांवर बोलण्याची त्यांची लायकी नाही अशी सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणारी भाषा महेश शिंदे यांनी वापरली.

महेश शिंदे यांच्या या वक्तव्याचा आमदार शशिकांत शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला. वेगवेगळ्या ठिकाणी सुरुवात करण्यासाठी शरद पवार यांनी आशीर्वाद दिला म्हणून महेश शिंदे इथपर्यंत पोहोचले. पण बापाला विसरण्याची प्रवृत्ती काही लोकांमध्ये असते, त्यामुळे त्यांच्याकडून काही अपेक्षा करणे योग्य नाही अशी सणसणीत चपराक त्यांनी लगावली.

जशास तसे उत्तर देऊ - शशिकांत शिंदे 

महेश शिंदे यांनी आपल्या लायकीमध्ये राहावे. आम्ही सगळं सहन करू, परंतु शरद पवार यांच्याविषयी बोलल्यास जशास तसे उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत असे शशिकांत शिंदे यांनी त्यांना सुनावले. पवार साहेबांवर टीका केल्यावर काय होते हे महाराष्ट्राने पाहिले आहे. सातारा जिल्ह्यात अशा वक्तव्याचा उमेदवाराला फायदा होतो की तोटा हे येत्या निवडणुकीत दिसून येईल असेही शशिकांत शिंदे म्हणाले. 

NCP Leader Sharad Pawar, Shashikant Shinde, Mahesh Shinde, Satara Loksabha constituency

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या