Satara News : ... तर साताऱ्याला दोन खासदार मिळतील


केळघर येथील सभेत जयंत पाटील यांनी मतदारांना केले आवाहन 

Satara News : 'उदयनराजे भोसले हे सध्या राज्यसभा खासदार आहेत. त्यामुळे साताऱ्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना विजयी करा, म्हणजे साताऱ्याला दोन खासदार मिळतील' अशा मार्मिक शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सातारा मतदारसंघातील जनतेला साद घातली.

सातारा लोकसभा मतदार संघाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ जावली तालुक्यातील केळघर येथे आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते. याप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, डॉ. भारत पाटणकर, सदाशिव सपकाळ, दीपक पवार, सारंग पाटील, बापूराव पार्टे, पार्टे गुरुजी, विश्वनाथ धनवडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील यांच्या या आवाहनाला मतदारांकडून जोरदार दाद मिळाली.

जनतेनेच निवडणूक घेतली हातात

या देशात हुकूमशाही प्रवृत्ती बळकट होत असून या देशातील नागरिकांचे अधिकार संकुचित होतील की काय अशी भीती निर्माण झाली आहे. याबद्दल आवाज उठवणाऱ्यांना तुरुंगात टाकले जात आहे. याला आळा घालण्याच्या निर्धाराने सर्वसामान्य जनतेनेच आता ही निवडणूक हातात घेतली असल्याचे प्रतिपादन जयंत पाटील यांनी यावेळी केले.

लोकशाही बळकट करूयात

आज देशात स्वातंत्र्य टिकवून ठेवायचे असेल, देशातील वंचित व दीनदलित लोकांचा आवाज जपायचा असेल तर विरोधी पक्षांचा आवाज बुलंद केला पाहिजे. तरच देशात लोकशाही टिकेल. देशातील जनता ही महागाई, बेरोजगारी, विविध करांच्या जाचाने त्रस्त आहे. युवकांना बेरोजगार केले जात आहे. त्यामुळे केंद्रातील सरकार घालवण्यासाठी महाविकास आघाडीला विजयी करून लोकशाही बळकट करूयात, असे आवाहन जयंत पाटील यांनी उपस्थितांना केले. यानिमित्ताने कृषी संस्कृतीचे प्रतीक असणाऱ्या बैलगाडीतून जयंत पाटील यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

सभेस संतोष चव्हाण, नितीन गोळे, सुहास गिरी, मोहनदादा शिंदे, हेमंत शिंदे, समिंद्राताई जाधव, अतिश कदम, रूपाली भिसे, सुरेश गोळे, विठ्ठल गोळे तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कराड उत्तरमधील प्रचाराचा शुभारंभ

दरम्यान, शशिकांत शिंदे यांच्या कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील प्रचाराचा शुभारंभ पाल (श्री खंडोबाची) येथे आमदार बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

याप्रसंगी डॉ.भारत पाटणकर, डॉ. सुरेश जाधव, ॲड. रवींद्र पवार, राजेंद्र शेलार, अजितराव पाटील - चिखलीकर, जयवंत पाटील, मानसिंगराव जगदाळे, देवराजदादा पाटील, हर्षद कदम, सारंग पाटील, संजय देशपांडे, कांतीलाल पाटील, शहाजीराव क्षीरसागर, प्रणव ताटे यांच्यासह जिल्हा परिषद - पंचायत समितीचे आजी माजी संचालक, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे आजी - माजी संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, इंडिया आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Mahavikas Aghadi Rally in Kelghar, NCP (SHARADCHANDRA PAWAR) Leader Jayant Patil

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या