Satara News : मतदानासाठी दोन बॅलेट युनिट्स लागणार


हा लोकशाहीचा उत्सव... मतदान केंद्रात येऊनच मतदान करणार !

Satara News : सातारा लोकसभा मतदारसंघात १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून १७ वा पर्याय नोटाचा द्यायचा असल्याने प्रत्येक ठिकाणी दोन बॅलेट युनिट्स लागणार आहेत. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

सातारा मतदार संघात निवडणूक पारदर्शक व निर्भयपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाचा भर असून आचारसंहितेचा कोणी भंग करत असल्यास किंवा प्रलोभन देत असल्यास नागरिकांनी त्याची तक्रार 1950 या क्रमांकावर किंवा सी व्हीजल ॲपवर तात्काळ करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

गृहभेटीतून मतदानाची प्रक्रिया सुरू 

सातारा जिल्ह्यात सेवा बजावणारे मतदार मोठ्या संख्येने आहेत. त्यासाठी पोस्टल बॅलेट पेपर पोहचविण्यात आले आहेत. 85 वर्षावरील वृद्ध व दिव्यांग मतदारांना गृह भेटीतून मतदानाचा पर्याय देण्यात आलेला आहे. पण बऱ्याच मतदारांनी हा लोकशाहीचा उत्सव असल्याने आम्ही मतदान केंद्रावर जाऊनच मतदान करू इच्छितो असे सांगितले आहे. ही एक अभिमानाची बाब आहे. यामुळे गृह भेटीतून मतदानाचा पर्याय निवडलेल्या 85 वयावरील तसेच दिव्यांग मतदारांची संख्या केवळ ११५० इतकी आहे. त्यांच्या मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे असे डुडी यांनी सांगितले.

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील यांना कुटुंबांची जबाबदारी देण्यात येणार आहे. ही सर्व टीम मतदानासाठी पात्र नागरिकांना प्रोत्साहित करतील. तसेच दि. १ पासून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे. 

नवमतदारांसाठी प्राचार्यांशी समन्वय

नवमतदार नोंदणी कार्यक्रमात तरुणांची मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली आहे. हे जास्तीत जास्त मतदार मतदान करतील यासाठी महाविद्यालयांतील प्राचार्यांशी समन्वय ठेवण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले.

सातारा जिल्ह्यातील नागरिक, महिला, तरुणांनी पुढे येऊन मोठ्या संख्येने मतदान करुन जिल्ह्याचा मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या पत्रकार परिषदेला उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे उपस्थित होते.

Satara Loksabha constituency, IAS Jitendra Dudi

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या