जनता बँकेत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे पुनर्गठन; नवीन ६ सदस्यांची निवड
Satara News : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशाप्रमाणे सातारा येथील जनता सहकारी बँकेत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यमान सदस्यांची मुदत संपल्यामुळे नवनिर्वाचित संचालक मंडळाने एकूण ६ सदस्यांची नव्याने सदस्यपदी निवड केली आहे. त्यापैकी चेअरमनपदी विनोद कुलकर्णी यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली.
याप्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल जठार यांनी प्रास्ताविक करून बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय करून दिला. त्यामध्ये बँकेचे भागधारक पॅनेलप्रमुख, माजी चेअरमन, विद्यमान ज्येष्ठ संचालक विनोद कुलकर्णी, सातारा जिल्हा बार असोसिएशनचे सदस्य ॲड. चंद्रकांत बेबले, कर व गुंतवणूक सल्लागार विनय नागर, ज्येष्ठ संचालिका सुजाता राजेमहाडीक, चार्टर्ड अकौंटंट पंकज भोसले, श्रुती कदम यांचा समावेश आहे.
कुलकर्णी दहा वर्षांपासून पॅनल प्रमुख
बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चेअरमनपदी नियुक्त करण्यात आलेले विनोद कुलकर्णी हे गेली १८ वर्षे बँकेचे पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. गत १० वर्षापासून बँकेच्या सत्ताधारी भागधारक पॅनेलचे प्रमुख म्हणून ते कामकाज पहात आहेत. त्यांनी यापूर्वी बँकेचे चेअरमनपदही भूषवलेले आहे.
याप्रसंगी बोलताना कुलकर्णी म्हणाले, संचालक मंडळाने बँकेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी रिझर्व्ह बँक, सहकार खात्याच्या नियमांचे पालन करून बँकेचा कारभार पारदर्शक व ग्राहक हिताच्या दृष्टीने चालवण्यासाठी सर्व ६ उच्चशिक्षित अनुभवी व्यक्तींची बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या सदस्यपदी निवड केली आहे.
नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार
याप्रसंगी बँकेचे चेअरमन अमोल मोहिते, व्हाईस चेअरमन विजय बडेकर, संचालक जयवंत भोसले, वसंत लेवे, अक्षय गवळी, तज्ज्ञ संचालक राजेंद्र जाधव, सेवक संचालक अन्वर सय्यद, अभिजित साळुंखे यांच्या हस्ते नवनिर्वाचित बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या