Satara News : सातारा मतदारसंघात 63.16 टक्के मतदान


कोरेगावात सर्वाधिक; तर पाटणमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद 

Satara News : सातारा लोकसभा मतदार संघातील वेळ संपेपर्यंतच्या मतदानाची आकडेवारी हाती आली असून एकूण सरासरी ६३.१६ टक्के मतदान झाले. यामध्ये १८ लाख ८९ हजार ७४० मतदारांपैकी ११ लाख ९३ हजार ४९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 

सर्वाधिक ६७.५९ टक्के कोरेगाव विधानसभा मतदार संघात, तर सर्वात कमी ५६.९५ टक्के मतदानाची नोंद पाटण विधानसभा मतदारसंघात झाली आहे. ६४.९८ टक्के पुरुष, तर ६१.२८ टक्के स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

सातारा मतदारसंघासाठी मंगळवारी शांततेत व सुरळीतपणे मतदानाची प्रक्रिया पार पडली. या मतदान प्रक्रियमध्ये वृद्ध, तरुणांनी, नवमतदार, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

कोरेगावमध्ये ६७.५९ टक्के मतदान 

वाई विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख ४१ हजार ७१४ मतदारांपैकी २ लाख ७ हजार ८७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ६०.८३ टक्के मतदान झाले. कोरेगाव  मतदारसंघात एकूण ३ लाख १३ हजार १८३ मतदारांपैकी २ लाख ११ हजार ६८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे सर्वाधिक ६७.५९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

कराड उत्तर मतदारसंघात एकूण ६५.३४ टक्के मतदान झाले. या ठिकाणी एकूण २ लाख ९६ हजार ९४५ मतदारांपैकी १ लाख ९४ हजार २९ मतदारांनी मतदान केले. कराड दक्षिण  मतदारसंघात ६५.६५ टक्के मतदान झाले. या मतदारसंघात एकूण ३ लाख २ हजार ५८० मतदारांपैकी १ लाख ९८ हजार ६३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

पाटणमध्ये ५६.९५ टक्के मतदान 

पाटण विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी ५६.९५ टक्के मतदानाची नोंद झाली. या ठिकाणी एकूण २ लाख ९९ हजार ५६७ मतदारांपैकी १ लाख ७० हजार ६१६ मतदारांनी मतदान केले. सर्वांचे लक्ष लागलेल्या सातारा विधानसभा मतदारसंघात ६२.७४ टक्के मतदान झाले. या मतदारसंघात एकूण ३ लाख ३५ हजार ७५१ मतदारांपैकी २ लाख १० हजार ६५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

संपूर्ण जिल्हा प्रशासनाने मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी अहोरात्र झोकून प्रयत्न केल्याने व त्यास सातारा लोकसभा मतदार संघातील मतदारांनी चांगली साथ दिल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले. जिल्ह्यातील मतदारांनी शांततेत, कायदा व सुव्यवस्था राखत मतदानाची प्रक्रिया पार पाडल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

Satara Loksabha constituency, Polling Percentage, Udayanraje Bhosale, Shashikant Shinde 

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या