Satara News : शरद पवार उद्या साताऱ्यात


ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत कर्मवीर पुण्यतिथी सोहळ्यास राहणार हजर

Satara News : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी निर्णायक टप्प्यावर असूनही आणि त्यातही सातारचे मतदान पार पडलेले असूनही गुरुवारी (दि. ९) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार सातारला येत आहेत. कर्मवीर पुण्यतिथी सोहळा त्यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६५ व्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या वतीने गुरुवारी सकाळी ८.३० वाजता येथील कर्मवीर समाधी परिसर येथे करण्यात आले आहे. 

शिक्षणप्रेमी नागरिकांनाही आवाहन

या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, जनरल बॉडी सदस्य, आजीव सेवक, आजीव कार्यकर्ते, संस्थेचे पदाधिकारी इत्यादी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास सर्व शिक्षणप्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी केले आहे. 

Padmabhushan Dr. Karmaveer Bhaurav Patil, NCP Leader Sharad Pawar

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या