Satara News : बारावी परीक्षेत दिशा ॲकॅडमीचे यश


सृजल सामंत प्रथम; वेदांत पडवळ, श्रावणी पवार दुसऱ्या, तिसऱ्या स्थानावर 

Satara News : बारावीच्या परीक्षेत वाई येथील दिशा ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळवले आहे. सृजल सामंत याने ९२.१७ टक्के गुण मिळवत ॲकॅडमीत पहिले स्थान पटकावले आहे. वेदांत पडवळ, श्रावणी पवार, यश निकम, रिया जमदाडे, यशराज साळुंखे अनुक्रमे २ ते ५ क्रमांकावर आहेत. 

दिशाच्या २९ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत, तर ७० ते ८० टक्क्यांपर्यंत गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ६७ आहे. दिशाच्या ६२ विद्यार्थ्यांनी फस्टक्लास विथ डिस्टिंक्शन मिळवले आहे. १२७ विद्यार्थ्यांनी फस्टक्लास, तर ५२ विद्यार्थ्यांनी सेकंड क्लास मिळविला आहे.

यशस्वी करिअरकडे गरूडझेप

यंदाच्या १२ वी बोर्डाच्या निकालात आमच्या २४१ विद्यार्थ्यांनी मिळविलेले घवघवीत यश हे त्यांनी यशस्वी करिअरकडे घेतलेली गरूडझेप आहे असे सांगत दिशा ॲकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन कदन यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांचे परिश्रम, विभागप्रमुख प्रा. सतिश मौर्य यांचे उत्तम नियोजन व शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचारी यांची साथ अशी एकत्रित गोळाबेरीज म्हणजेच दिशाच्या यशाची उंचावत जाणारी कमान असल्याचे सांगून प्रा. रूपाली कदम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. 

दिशाच्या यशाचा आनंद ॲकॅडमीत जोरदारपणे साजरा होत असताना समाजातील विविध स्तरातून यशस्वी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Disha Academy (Wai), Dr. Nitin Kadam

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या