बेलवाडीची कन्या मैथिलीने केले सलग तीन तास नृत्य सादरीकरण
Satara News : कराड तालुक्यातील बेलवाडी गावची कन्या मैथिली गणेश बोबडे हिने आरंगेत्रम आविष्काराने रंगमंचावर नुकतेच पदार्पण केले आहे. मुंबई येथील मैसूर असोसिएशन ऑडिटोरियम नाट्यगृहात सलग तीन तास तिने हा आविष्कार सजवताना आपल्या पदलालित्याने सर्वांना संमोहित केले.
महागुरू निपा शहा, महागुरू आरती देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत कलाविष्काराला प्रारंभ झाला. कार्यक्रमात गणपती स्तुती, पुष्पांजली, अलारिपू, शब्दम, वर्णम (रामायण), भक्ती (महाभारत), देवी स्तुती, तिल्लाना सादर करत मंगळमने तिच्या नृत्याविष्काराची सांगता झाली.
यावेळी महागुरु आरती देसाई, गुरु आमी शहा, शन्मुख सुंदरम, श्री वेंकटेश, सतीश शेषाद्री, श्री मुकुंद, श्री जयंतीभाई, मेहुल त्रिवेदी आदींची तिच्या नृत्य आविष्काराला साथ लाभली. यावेळी देवांग शहा, बेलवाडी गावचे ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील मान्यवर, हेळगावच्या पंचक्रोशी ग्रुपमधील सदस्य यांनी कार्यक्रमाला उपस्थित लावून खूप कौतुक करून शुभ आशिर्वाद दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुरली अय्यर यांनी केले. स्वागत गणेश बोबडे यांनी केले, आभार निखिल बोबडे यांनी मानले.
पाचवीपासूनच नृत्याचे धडे
गेली १२ वर्षे भरतनाट्यम विशारदचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मैथिलीने 'आरंगेत्रम' आविष्कारातून रंगमंचावर पदार्पण केले. मैथिली ही नुपूर झंकार कला केंद्र (मुंबई) येथील आमी शहा यांची शिष्या आहे. मैथिलीने इयत्ता पाचवीपासून नृत्याचे धडे घेण्यास सुरुवात केली होती. तसेच मुंबई येथील सलाम बॉम्बे थिएटर अकॅडमी येथेही पाच वर्ष नृत्याचे विविध प्रकारातील प्रशिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर तिने गुरु आमी शहा यांच्याकडे भरतनाट्यमची विशारद पदवी संपादन केली.
आजचा कार्यक्रम आजीला समर्पित
वयाच्या पाचव्या वर्षापासून आपण नृत्यकलेस प्रारंभ केला होता. विशेषतः आई वैशाली व वडील गणेश बोबडे यांनी आपल्यासाठी खूप मोठे कष्ट घेतले आहेत. तसेच भरतनाट्यम क्षेत्रातील गुरु, महागुरु आदिंसह विविध मान्यवरांचे मार्गदर्शन लाभल्यामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचू शकले आहे. अशा वेगळ्या क्षेत्रात नाव उज्वल करावे अशी आजीची खूप इच्छा होती. त्यामुळे आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम आपण आपल्या आजीला समर्पित करत आहोत असे मैथिलीने यावेळी सांगितले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या