महाबळेश्वर - तापोळा रस्त्यावर वनविभागाचा ट्रॅप; मुद्देमाल हस्तगत
Satara News : चंदन तस्करीच्या प्रचंड मोठ्या सिंडिकेटवर प्रकाशझोत टाकणाऱ्या 'पुष्पा' चित्रपटामुळे गुन्हेगारी जगताची एक वेगळी बाजू चर्चेत आली. अशाच चंदन तस्करीची एक छोटीशी आवृत्ती महाबळेश्वर - तापोळा भागातील घनदाट जंगलात वनविभागाने उघडकीस आणली आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
अक्षय अर्जुन चव्हाण (वय २०, रा. फत्त्यापूर, ता. जि. सातारा), आशिष विकास पवार (वय १६, रा. खातगुण, ता. खटाव, जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
वन विभागाकडून कारवाई
महाबळेश्वर ते तापोळा दरम्यान चंदन तस्करीच्या अनुषंगाने एक वाहन आले असल्याची खात्रीशीर माहिती बुधवारी वनविभागाला प्राप्त झाली होती. त्या माहितीच्या आधारे सातारा वन विभागाच्या उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज, सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण) महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वरचे वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश महांगडे, पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, पोलीस उपनिरीक्षक रऊफ ईनामदार, तापोळ्याच्या वनपाल अर्चना शिंदे, वनरक्षक (कळमगाव) संदीप पाटोळे यांनी यांनी या मार्गावर पाळत ठेवून वानवली गावच्या हद्दीवर रस्त्यालगत उभी असलेली चारचाकी गाडी (एमएच ०१ व्हीए ४२५२) पकडली.
वन अधिनियमाखाली गुन्हा
या गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये दोन इसम व गाडीमध्ये एका पिशवीमध्ये चंदनाच्या लाकडाचे तुकडे (वजन १७.२३१ किलो), १ बॅटरी, १ नी गार्ड, १ कटर, ३ करवती, १ कुदळ, ३ मोबाईल संच इत्यादी साहित्य मिळाल्याने संबंधित इसम चंदन तस्कर असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून हे साहित्य जप्त करण्यात आले.
आरोपींविरुद्ध भारतीय वनअधिनियम, १९२७ चे कलम ४१(२) (ब) अन्वये कारवाई करण्यात आली. पुढील तपास वनपाल अर्चना शिंदे करीत आहेत.
Satara Forest department, Mahabaleshwar - Tapola Road, Aditi Bhardwaj
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या