'गौरीशंकर'मध्ये गुणगौरव समारंभ; सर्वगुणसंपन्न व्हा - श्रीरंग काटेकर
Satara News : ध्येयपूर्तीसाठी सर्वगुणसंपन्न असण्याची खरी गरज असून जे विद्यार्थी सर्वगुणसंपन्न असतील त्यांचाच भविष्यकाळ हा उज्ज्वल असणार आहे असे विचार येथील गौरीशंकर नॉलेज सिटीचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले.
लिंब (ता. जि. सातारा) येथील गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्यूटिकल एज्युकेशन अँड रिसर्च या महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष सन २०२३-२४ मध्ये कला, क्रीडा, ज्ञान, संशोधन व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेश गुरव, डॉ. संतोष बेल्हेकर. प्रा. माधुरी मोहिते, प्रबंधक निलेश पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करावे
काटेकर पुढे म्हणाले, शैक्षणिक ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांनी स्पर्धेतील आव्हाने ओळखून स्वतःला सर्वगुणसंपन्न करणे गरजेचे आहे. काळाची बदलती समीकरणे पाहता शारीरिक, मानसिक तंदुरुस्ती सर्वात महत्त्वाची ठरणार आहे. विविध स्पर्धा विशेषत: कला, क्रीडा, संशोधन, सांस्कृतिक उपक्रमातून विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करावे.
प्राचार्य डॉ. योगेश गुरव म्हणाले, शैक्षणिक प्रगतीबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तितकाच महत्त्वाचा आहे. केवळ गुणात्मक वाढ हे उद्दिष्ट न ठेवता विद्यार्थ्यांनी स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी परिश्रम घ्यावेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार
प्रारंभी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार श्रीरंग काटेकर, प्राचार्य डॉ. योगेश गुरव यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये द्वितीय वर्षात प्रथम क्रमांक प्रविणा कोकाटे व तृतीय वर्षात प्रथम क्रमांक प्राप्त करणारा प्रणील राऊत तर विद्यापीठ स्तरावर आविष्कार स्पर्धेत विशेष उल्लेखनीय कामगिरी करणारा शंतनू चकोते यांना गौरवण्यात आले. सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान द्वितीय वर्ष बी फार्मसी विद्यार्थ्यांनी पटकावला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. कीर्ती माने, प्रा. शुभम चव्हाण, प्रा. प्राजक्ता कांबळे, प्रा. तरन्नुम नदाफ यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक व आभारप्रदर्शन कु. नूतन गवांदे हिने केले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या