Satara News : दहावीत 'गुरुकुल'चा १०० टक्के निकाल


सातारच्या गुरुकुल स्कूलची गुणवत्तेत बाजी; शाळेत सई सिध्दे प्रथम 

Satara News : दहावीच्या परीक्षेत सातारा येथील गुरूकुल स्कूलचा १०० टक्के निकाल लागला असून कु. सई सचिन सिध्दे हिने ९८.२० टक्के गुण प्राप्त करून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. याही वर्षी गुरूकुल स्कूलने गुणवत्तेमध्ये बाजी मारली आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या गुरूकुल स्कूलने सलग चौदाव्या वर्षी १०० टक्के निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवली आहे. शाळेतील कु. सई सचिन सिध्दे हिने ९८.२० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक, प्रथमेश अजितकुमार कणसे याने ९८ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक, कु. श्लोका संदिप माने हिने ९७.६० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक, कु. संस्कृती संतोष शेंडे हिने ९७ टक्के गुणांसह चौथा क्रमांक, शौर्य निलेश जगताप याने ९६.८० टक्के गुणांसह पाचवा क्रमांक, कु. प्रांजल अनिरुध्द कासकर हिने ९६.४० टक्के गुणांसह सहावा क्रमांक पटकावला.

११४ विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये

दहावीच्या परीक्षेला गुरूकुल स्कूलचे १२२ विद्यार्थी बसले होते. यापैकी ११४ विद्यार्थी विशेष गुणवत्तेसह उत्तीर्ण झाले असून १५ विद्यार्थ्यांनी ९५ टक्केपेक्षा जास्त, ४० विद्यार्थ्यांनी ९० टक्केपेक्षा जास्त, ५० विद्यार्थ्यांनी ८० टक्केपेक्षा जास्त, १७ विद्यार्थ्यांनी ६० टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत. संस्कृत विषयामध्ये १०० पैकी १०० गुण मिळवणारे एकूण ३ विद्यार्थी, गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवणारा १ विद्यार्थी आहे. शाळेचा सरासरी निकाल ८७.४८ टक्के लागला.


गुरूकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, सचिव आनंद गुरव, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शीला वेल्हाळ, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अनुराधा कदम, उपमुख्याध्यापिका सोनाली तांबोळी, जनसंपर्क अधिकारी विश्वनाथ फरांदे, वर्गशिक्षिका मृणालिनी अलगुडे, ललिता कारंडे, योगिनी काळे यांनी यावेळी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सर्वांगीण विकास हेच उद्दिष्ट

यावेळी बोलताना गुरूकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या इतर उपक्रमाबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात सुध्दा विद्यार्थी उज्ज्वल कामगिरी करत आहेत याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. यासाठी सर्व शिक्षक व पालक यांचे योगदान महत्वाचे ठरत आहे.

अर्जुन चोरगे, मधुकर जाधव, नितीन माने, संजय कदम, जगदिश खंडेलवाल, अंबाजी देसाई, उदय गुजर, दीपक मेथा, हरिदास साळुंखे, राजेंद्र खंडेलवाल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या