सातारा तालुका पोलिसांनी ठोकल्या बेड्या; दागिने हस्तगत
Satara News : नात्यातील महिलेनेच घरातून सोन्याचांदीचे दागिने लंपास केल्याची घटना सातारा तालुक्यातील वडूथ येथे घडली. तथापि, सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने हा गुन्हा उघडकीस आणून या महिलेस बेड्या ठोकल्या व चोरीला गेलेले दागिने तिच्याकडून हस्तगत केले.
सातारा तालुक्यातील वडुथ येथील दिपाली संतोष बोराटे यांच्या घरातून दि. २१ जून रोजी सहा तोळे सोने व चांदीचे दागिने चोरीला गेल्याची फिर्याद त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात नोंदवली होती. या गुन्ह्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस प्रमुख सातारा, समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस उपअधीक्षक राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांनी गुन्ह्यातील आरोपीस तात्काळ ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्याने सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने या प्रकरणातील आरोपीची गोपनीय पद्धतीने माहिती मिळवून संशयित महिलेस सातारा तालुक्यातील कळंबे येथून ताब्यात घेतले.
महिलेकडून चोरी केल्याची कबुली
तिच्याकडे कसोशीने चौकशी केली असता चौकशीदरम्यान ही महिला फिर्यादीची नातेवाईक असून तिने ही चोरी केल्याची कबुली दिली. तिच्याकडून सहा तोळे सोने व चांदीचे दागिने ताब्यात घेतले. अधिक तपास परि. पोलीस उपनिरीक्षक एस. के. शिंदे करित आहेत.
गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी
ही कारवाई गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक एस. के. शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव, पोलीस हवालदार राजू शिखरे, मालोजी चव्हाण, पोलीस नाईक किरण जगताप, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी डफळे, संदिप पांडव, होमगार्ड विवेक शेडगे, होमगार्ड विठ्ठल सावंत यांनी केली आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या