Satara News : एम. बी. पतकी यांचे निधन


युनायटेड वेस्टर्न बँकेतील तत्वनिष्ठ अधिकारी म्हणून होता नावलौकिक 

Satara News : युनायटेड वेस्टर्न बँकेतील सेवानिवृत्त अधिकारी मच्छिंद्र बाळकृष्ण पतकी (वय ८३) यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, पत्रकार मधुसूदन पतकी, मनोज पतकी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

युनायटेड वेस्टर्न बँकेच्या केवळ सहा शाखा असताना मच्छिंद्र पतकी तथा एम. बी. हे बँकेत रुजू झाले होते. कर्तव्यकठोर, बँकिंग क्षेत्रात अभ्यासू, तत्वनिष्ठ अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. इन्स्पेक्शन विभागात त्यांनी आपला ठसा उमटवला होता. विदर्भातील नव्याने सुरू केलेल्या शाखा प्रगतीपथावर आणण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता.

अंत्यसंस्कारप्रसंगी मान्यवरांची उपस्थिती 

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी त्यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. अंत्यसंस्कारास समाजातील प्रतिष्ठित मान्यवर, पत्रकार, बँकेतील कर्मचारी उपस्थित होते.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या