विविध पदांवर प्रभावी कामगिरी; कर्तृत्ववान विद्यार्थी घडवणारे 'गुरूदेव' हरपले
Satara News : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव, आजीव सेवक व महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी सेक्रेटरी प्राचार्य एन. जी. गायकवाड यांचे शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ८५ वर्षे होते. त्यांच्या पश्चात मुले अभयराज, प्राचार्य डॉ. महेश व गिरीश गायकवाड, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
मूळचे पाटण तालुक्यातील चाफळवासी असलेल्या गायकवाड सरांनी एकूण ३७ वर्षे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये विविध पदावर सेवा केली. विवेकानंद शिक्षण संस्थेचे सातारा जिल्हा विभाग प्रमुख म्हणून वीस वर्ष आणि संस्थेच्या प्रशासन सहसचिवपदी तीन वर्षे त्यांनी प्रभावी कामगिरी केली. विद्यार्थीप्रिय शिक्षक असलेल्या गायकवाड सरांनी अनेक कर्तृत्ववान विद्यार्थी घडवले.
वारकरी संप्रदायात मोलाचे योगदान
धार्मिक वृत्तीचे असलेल्या गायकवाड सरांचे अध्यात्म व ज्ञानेश्वरीवर अत्यंत प्रभावी वक्तृत्व होते.
एन. जी. गायकवाड हे शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे विद्यार्थी होते. बापूजींच्या विचारांचे सच्चे पाईक आणि संस्थेचे निष्ठावान गुरुदेव कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. शिक्षणतज्ज्ञ व संत साहित्याचे अभ्यासक असलेल्या गायकवाड यांचे वारकरी संप्रदायातील योगदान महत्त्वाचे आहे. ते प्रवचनकार आणि व्याख्याते म्हणून सुप्रसिद्ध होते. त्यांच्या निधनाबद्दल विवेकानंद संस्थेचे प्रमुख अभयकुमार साळुंखे आणि संस्थेतील इतर मान्यवरांनी संगम माहुली येथे श्रद्धांजली वाहिली. सरांच्या निधनाने चाफळसह स्वामी विवेकानंद संस्थेचे गुरुदेव कार्यकर्ते व सांप्रदायिक परिवारामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या