शिवप्रतापाची साक्ष देणारा अनमोल ठेवा पाहण्याची अपूर्व संधी
Satara News : मराठ्यांच्या दैदीप्यमान इतिहासात छत्रपती शिवरायांनी वाघनखांच्या साह्याने प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखानाचा वध केला होता, त्या ऐतिहासिक वाघनखांचे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साताऱ्यात आगमन होत आहे हा ऐतिहासिक क्षण आहे. या क्षणाचे सातारकरांनी साक्षीदार व्हावे असे आवाहन येसूबाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी केले आहे.
सातारा येथील छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. संग्रहालयाच्या प्रदर्शनी दालनामध्ये विशेष बंदोबस्तात वाघनखे ठेवण्यात येणार आहेत. या वाघनखांना लंडनच्या म्युझियममधून जुलै महिन्यामध्ये एक वर्षासाठी महाराष्ट्रात आणण्यात येणार असून दहा महिन्यांसाठी त्याचे वास्तव्य शिवाजी संग्रहालयात राहणार आहे. याकरता विशेष काचपेटीचे आयोजन करण्यात आले असून हा संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये बंदिस्त राहणार आहे.
वाघनखांचे आगमन हा ऐतिहासिक क्षण
या वाघनखांच्या संरक्षणासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त राहणार आहे. या पूर्वतयारीची पाहणी शिवाजी संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे व येसूबाई फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी केली. नूतन दालने आणि ऐतिहासिक शिवकालीन साहित्यासह शिवाजी संग्रहालय सुसज्ज होत असून लवकरच ते सातारकरांसाठी खुले होत आहे. शिवाजी संग्रहालयात वाघनखांचे आगमन हा मोठा ऐतिहासिक क्षण असणार आहे. या क्षणाचे सातारकरांना साक्षीदार होण्याची संधी आहे.
ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा - सुहास राजेशिर्के
यासंदर्भात राजेशिर्के म्हणाले, साताऱ्याची भूमी ही ऐतिहासिक असून छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. साताऱ्यात छत्रपतीं घराण्याचे वंशज खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वास्तव्य आहे. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची अनुभूती देणाऱ्या अनेक घटनांमध्ये प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखानाचा झालेला वध हा एक दैदिप्यमान क्षण आहे. वाघनखे पुढील दहा महिन्यांसाठी शिवाजी संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे. हा अत्यंत ऐतिहासिक आणि दुर्मिळ क्षण आहे. या क्षणाचे साक्षीदार सातारकरांनी निश्चित व्हावे आणि शिवाजी संग्रहालयाला भेट देऊन वाघनखांचे दर्शन घ्यावे अशी अपेक्षा आणि आवाहन सुहास राजेशिर्के यांनी केले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या