Satara News : झाडाणी प्रकरणात नवा ट्विस्ट


नोटीसधारकांचे वकीलपत्र रद्द; ३ जुलैला समक्ष हजर राहण्याचे आदेश 

Satara News : महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी येथील तब्बल ६२० एकर जमीन बळकावल्याच्या प्रकरणात सर्व नोटीसधारकांचे वकीलपत्र रद्द करण्यात आले असून दि. ३ जुलैला समक्ष उपस्थित राहण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी दिले आहेत.

सातारा येथील माहिती अधिकार, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी सह्याद्री वाचवा मोहिमेतंर्गत झाडाणी प्रकरणी सुरु केलेल्या लढ्याला या रुपाने आणखी एक मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे. झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथील तब्बल ६२० एकर जमीन जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाईकांनी बळकावल्याचे कागदपत्रांवरुन स्पष्ट झाले होते. याप्रकरणी पहिल्यांदा तिघांना आणि नंतर आठ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्याची सुनावणी गुरुवारी (दि. २०) झाली. यावेळी महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम १९६१ कमाल जमीन धारणातील ४४ ब नुसार सर्व नोटीसधारकांचे वकीलपत्र रद्द करण्यात आले असून दि. ३ जुलैला समक्ष उपस्थित राहण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी दिले आहेत.

'त्यांनी' वकीलपत्र सादर केले होते

या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, पियुष बोगीरवार यांच्यासह आणखी आठ जणांना नोटीस काढून गुरुवारी दि. २० जून रोजी सुनावणीस उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. गुरुवारी अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्या दालनात सुनावणी सुरु झाल्यानंतर याप्रकरणी नोटीस बजावलेल्यांनी वकीलपत्र सादर केले होते. ते  महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम १९६१ मधील ४४ ब कलमानुसार अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले. तसेच याप्रकरणी पुढील सुनावणी दि. ३ जुलै २०२४ रोजी होणार असून यावेळी नोटीस बजावलेल्या सर्वांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या