पावसकरांच्या सहभागाबाबत तपास करून अहवाल सादर करा
Satara News : सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथील घडलेल्या दंगल व हत्याकांडात भाजपचे पदाधिकारी विक्रम पावसकर यांचा सहभाग स्पष्ट करण्याकरिता कलम १७४ (८) या अनुषंगाने पुढील तपास करून उच्च न्यायालयात सहा आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रेवती मोहिते - डेरे व न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या बेंचने दिले आहेत.
सातारा पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयात इस्लामपूरचे काँग्रेसचे शाकीर तांबोळी यांनी केलेल्या याचिकेवर हा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.
पावसकर यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्रामुख्याने खटाव तालुक्यातील औंध पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाती-जातीमध्ये तणाव निर्माण होईल व मुस्लिमांच्या विरोधात द्वेषपूर्ण अशी भाषणे केली होती. त्या विरोधात शाकीर तांबोळी तसेच विविध संघटना, कार्यकर्ते यांनी सातारा जिल्हा पोलीस प्रशासनास विक्रम पावसकर यांच्या विरोधात वेळोवेळी गुन्हे दाखल करण्याबाबत निवेदने दिली होती.
कोणतीच कारवाई होत नव्हती
औंध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुसेसावळी येथील मुस्लिम युवकाचा खून तसेच पुसेसावळी येथील सार्वजनिक व खासगी मालमत्तेची जाळपोळ व नुकसान याविरोधात औंध पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. भारतीय दंड संहिता कलम १५३, २९५ अ अन्वये गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले होते. गुन्हे दाखल झाले, परंतु राजकीय दबावामुळे पोलीस पुढील कारवाई करण्यास टाळाटाळ करीत होते व त्याकरिता शासन मंजुरीची आवश्यकता असल्याने विक्रम पावसकर यांच्यावर कोणतीच कारवाई होत नव्हती. त्यामुळेच शाकीर इसालाल तांबोळी यांनी पोलीस प्रशासनाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
सांगली पोलिसांचे शपथपत्र
सांगली जिल्ह्यातील विटा व इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये दोन्हीही दाखल गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र तयार असून पुढील कारवाई शासन मंजुरीसाठी प्रलंबित आहे असे सांगली पोलिसांनी उच्च न्यायालयात शपथपत्र सादर केले होते. त्याच अनुषंगाने पुढील कारवाईकरिता सरकारी वकील एच. एस. वेणेगावकर यांनी उच्च न्यायालयास चार आठवड्याच्या मुदतीची विनंती मागणी केली असता उच्च न्यायालयाने ती मान्य करून चार आठवड्यामध्ये शासन मंजुरी घेऊन न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
विक्रम पावसकर यांच्या हस्तक्षेप अर्जाच्या अनुषंगाने ॲड. डॉ. अभिनव चंद्रचूड व यशोधन देशमुख हे बाजू मांडत आहेत. तर शाकीर इसालाल तांबोळी यांच्या वतीने ज्येष्ठ कायदेतज्ञ मिहीर देसाई आणि श्रीमती संस्कृती याज्ञिक या काम पाहत आहेत. सरकारच्या वतीने एच. एस. वेणेगावकर व सहाय्यक सरकारी वकील श्रीमती पी. पी. शिंदे या काम पाहत आहेत.
एसआयटीमार्फत फेरतपासाची मागणी
पुसेसावळी येथे घडलेल्या हत्याकांडाचा तपास हा पूर्णपणे राजकीय दबावाखाली एकतर्फी झाला असून यामध्ये गुन्हेगार मोकाट सुटले आहेत व पुराव्यांशी सुद्धा छेडछाड झाली आहे. त्यामध्ये सातारा पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळे या हत्याकांडाच्या फेरतपासासाठी एसआयटी लावण्याची मागणी उच्च न्यायालयामध्ये करीत आहोत, असे शाकीर तांबोळी यांनी यासंदर्भात सांगितले.
Satara district police, Sangli district police, Bombay High court
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या