Satara News : वाई अर्बनमध्ये रक्तदान शिबीर


वर्धापन दिनानिमित्त आयोजन; संचालकांसह ७५ जणांचे रक्तदान 

Satara News : वाई येथील दि वाई अर्बन को - ऑपरेटिव्ह बँकेच्या १०३ व्या वर्धापन दिनानिमित्त ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. बँकेच्या संचालक मंडळाने व्यक्त केलेला मानस व त्यास सर्वांनी दिलेला सहभाग अत्यंत मोलाचा असल्याचे गौरवोद्गार बँकेचे अध्यक्ष अनिल देव, उपाध्यक्ष डॉ. शेखर कांबळे यांनी व्यक्त केले.

सातारा येथील माऊली रक्तपेढीच्या सहकार्याने बँकेच्या प्रधान कार्यालयात हे शिबीर घेण्यात आले. संचालक चंद्रकांत गुजर यांच्या हस्ते फीत कापून या शिबिराची सुरुवात करण्यात आली. बँकेचे ज्येष्ठ संचालक विवेक पटवर्धन, मकरंद मुळ्ये, अशोक लोखंडे, प्रीतम भुतकर तसेच बँकेतील अधिकारी, संचालक व बँकेचे ग्राहक, व्यापारी असोसिएशनचे सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी, हितचिंतक यांनी यात सहभाग घेतला. दुपारपर्यंत ७५ मान्यवरांनी रक्तदान केले. सहभागी रक्तदात्यांना माऊली पतपेढीच्यावतीने सन्मानपत्र देण्यात आले. 

माऊली रक्तपेढीचे सहकार्य 

याप्रसंगी बँकेचे संचालक माधव कान्हेरे, रमेश भुरमल, काशीनाथ शेलार, चंद्रकांत गुजर, संचालिका सौ. ज्योती गांधी, बोर्ड आँफ मॅनेजमेंटचे सदस्य अविनाश जोशी, रामचंद्र कानडे, अनंत जोशी, बँकेचे वैधानिक लेखापरिक्षक सीए. प्रवीण आवटे आदी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सरव्यवस्थापक चंद्रशेखर काळे यांनी आभार मानले. माऊली रक्तपेढीचे डॉ. गिरिश पेंढारकर, डॉ. रमन भट्टड, अजित कुबेर, माधव प्रभुणे व त्यांचे सहकारी यांनी रक्तसंकलन केले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या