Satara News : कोयना विभागात अवैध दारूधंदे


... अन्यधा शिवसेना स्टाईलने आंदोलन; पोलीस ठाण्याला निवेदन

Satara News : पाटण तालुक्यातील कोयना व काजळी विभागातील अवैद्यरित्या चालणारे दारू धंदे बंद करा. अन्यधा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या तालुक्यातील पदाधिकार्‍यांनी दिला आहे.

यासंदर्भात कोयना पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आले आहे. कोयना पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक अवैद्य धंदे सुरू असून ते बंद व्हावेत यासाठी शिवसेनेच्या युवासेनेने अनेकदा तोंडी व निवेदनाद्वारे मागणी केली होती. मात्र हे धंदे सुरूच असल्याने अनेकाचे संसार देशोधडीला लागले आहेत. तर महिला व कुटुंबियांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कोयनानगर पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार टिळेकर यांना हे निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी युवासेना पाटण तालुका प्रमुख अक्षय कदम, शिवसेना कोयना विभाग प्रमुख महेश शेलार, कोयना विभाग संघटक प्रदीप निंबाळकर, सुरेश जाधव, किसन सुतार, मयूर मरगजे, पांडुरंग कदम, रोहन सावंत आदी उपस्थित होते.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या