Satara News : सातारचे नंदकुमार सावंत 'मसाप'वर


जिल्हा प्रतिनिधीपदी एकमताने निवड; प्रा. मिलिंद जोशींची माहिती 

Satara News : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेच्या सातारा जिल्हा प्रतिनिधीपदी मसापच्या शाहूपुरी शाखेचे कार्याध्यक्ष नंदकुमार सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली. 

जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांची मसाप, पुणेच्या कोषाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी जिल्हा प्रतिनिधीपदाचा राजीनामा दिला होता. त्या रिक्त झालेल्या जागेवर मसाप कार्यकारी मंडळाच्या बैठकीत नंदकुमार जगन्नाथ सावंत यांचे नाव जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ यांनी सुचवले. त्याला कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्यवाह शिरीष चिटणीस यांनी अनुमोदन दिल्याने सावंत यांची एकमताने निवड झाल्याची माहिती मसाप, पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

विविध उपक्रमात सहभाग 

नंदकुमार सावंत हे शाहूपुरी शाखेच्या स्थापनेपासून विनोद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. मराठी भाषा पंधरवडा, विविध साहित्य संमेलने, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवण्याचा उपक्रम, त्याच अनुषंगाने दिल्लीत झालेले आंदोलन, विविध चर्चासत्रे आणि कार्यक्रम, बा. सी. मर्ढेकर यांच्या घराचे नूतनीकरण आणि त्याचे स्मारकात रुपांतर या सर्व उपक्रमात सावंत यांनी सक्रीय योगदान दिले आहे. या योगदानाची दखल घेऊन त्यांची जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. 

या बैठकीला मसाप पुणेच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, १५ जिल्ह्यांचे प्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते. मसाप व शाहूपुरी शाखेचे नाव आणि प्रतिष्ठा वाढवण्यासाठी काम करत राहीन. या निवडीमुळे आजपर्यंत केलेल्या कामाला न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया सावंत यांनी निवडीनंतर व्यक्त केली. 

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या