Satara News : साताऱ्यात भोंदूबाबास अटक


भोंदूगिरी रोखण्यासाठी जिल्हा दक्षता अधिकारी नेमावा; अंनिसची मागणी

Satara News : पैशाचा पाऊस पाडून देतो, गुप्तधन काढून देतो, मौल्यवान आरपी कॉइन तयार करून ५० कोटी मिळवून देतो, वीज पडलेल्या दगडाचे भांडे मिळवून देतो अशी आमिषे दाखवून ३६ लाख रुपयांना लुबाडणाऱ्या पोलादपूरच्या काका महाराजास सातारा पोलिसांनी अटक केली.

सातारा पोलिसांनी स्वतः पुढाकार घेवून केलेल्या या कार्यवाहीचे स्वागत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे. या प्रकरणांमध्ये अनेक जणांची फसवणूक झाली आहे. हे मोठे फसवणुकीचे रॅकेट असावे असा संशय आहे. संशोधनासाठी लागणाऱ्या मौल्यवान वस्तू तयार करून त्यातून करोडो रुपये मिळवून देतो अशा भुलथापा देऊन काही मांत्रिक लोकांना लाखोचा गंडा घालत आहेत. 

पैशाचा पाऊस ही अंधश्रध्दा

विज्ञानाच्या काही ट्रिक वापरून, हातचलाखी करून लोकांना भुरळ घातली जाते. हे सर्व फसवणुकीचे प्रकार आहेत. पैशाचा पाऊस ही अंधश्रध्दा आहे. सुशिक्षित लोकांनी याला बळी पडू नये असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातारा शाखेचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर व प्रशांत पोतदार यांनी केले आहे. अशी फसवणूक झालेले आणखी कोणी तक्रारदार असतील तर त्यांनी पुढे येवून पोलिसांशी अथवा जवळच्या अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

म्हैसाळसारखी घटना घडू नये 

म्हैसाळ येथे अशाच प्रकारची फसवणूक करून संपूर्ण कुटुंब मंत्रिकाने विष देऊन संपवले होते. या प्रकरणात पैशाचा पाऊस अशा गोष्टी असल्याने म्हैसाळसारख्या गोष्टी होऊ नयेत म्हणून जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेणे आवश्यक आहे. जादुटोणा विरोधी कायद्यासाठी जिल्हा दक्षता अधिकारी नेमावा अशी मागणी अंनिसने केली आहे. तसेच सातारचे जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांना अंनिसचे शिष्टमंडळ भेटून जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रचारासाठी जिल्हाव्यापी पोलीस प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावेत अशी मागणी करणार आहे.

दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात भोंदूगिरी

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात काही दिवसांपूर्वी गुप्तधनासाठी खड्डा खोदलेला होता, पाटणमध्ये देखील दोन वर्षांपूर्वी नरबळीची घटना झाली होती. पाटणमधील दुर्गम भागात अजून देखील मोठ्या प्रमाणात भोंदूगिरी चालते. त्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळणे आवश्यक आहे असे मत सातारा अंनिसचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार, डॉ. दीपक माने, हौसेराव धुमाळ, भगवान रणदिवे, प्रकाश खटावकर, वंदना माने यांनी व्यक्त केले आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या