दुहेरी मोक्क्यातील दोन वर्षांपासून परागंदा असलेला आरोपी जेरबंद
Satara News : सातारा जिल्ह्यातील वडूज व मसूरला दोन वर्षांपूर्वी पडलेल्या सशस्त्र दरोड्यातील फरार असलेल्या मोस्ट वॉन्टेड सराईत आरोपीच्या सातारा पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या. अतुल लायलन ऊर्फ नायलन भोसले (वय २६, रा. कासारी, ता. आष्टी, जि. बीड) असे त्याचे नाव आहे. दुहेरी मोक्क्यामध्ये सुमारे दोन वर्षांपासून तो पोलिसांना हवा होता.
सन २०२२ मध्ये वडूज पोलीस स्टेशन हद्दीत तसेच मसूर येथील डॉ. वारे यांच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा पडला होता. त्यात कुटुंबीयांना जबर मारहाण करून मुद्देमाल लंपास केला होता. या गुन्ह्यांच्या तपासामध्ये परजिल्हयातील टोळी निष्पन्न झाली होती. त्यामध्ये टोळी प्रमुख आरोपी होमराज ऊर्फ होम्या उध्दव काळे (रा. वाकी शिवर, ता. आष्टी, जि. बीड) याने त्याच्या साथीदारांसह हे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यामध्ये टोळी प्रमुख आरोपी होमराज ऊर्फ होम्या उध्दव काळे व त्याच्या साथीदारांना अटक करुन त्यांच्यावर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
थरारक पाठलाग करून पकडले
दरम्यान, या गुन्ह्यामध्ये टोळी प्रमुख होमराज ऊर्फ होम्या उध्दव काळे याचा खास साथीदार अतुल लायलन ऊर्फ नायलन भोसले हा इतर आरोपींना अटक केल्यापासून परागंदा झाला होता. तो फलटण (जि. सातारा) येथे येणार असल्याची माहिती खास बातमीदाराकडून प्राप्त झाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व त्यांच्या पथकाने त्यास पाठलाग करुन ताब्यात घेतले आहे. नायलन भोसले हा वडूज व उंब्रज पोलीस ठाण्यांतर्गत मोक्कांतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये सुमारे दोन वर्षांपासून पाहिजे असलेला आरोपी आहे.
मसूर, वडूज दरोड्यांची थरारक स्टोरी...
https://www.sataraupdates.com/2022/03/satara-news_15.html
जिल्हा पोलिसांची दमदार कारवाई
या कारवाईमध्ये जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटिल, पृथ्वीराज ताटे, रोहीत फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार सुधीर बनकर, पोलीस हवालदार साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, सचिन साळुंखे, सनी आवटे, मुनीर मुल्ला, अमित झेंडे, अजय जाधव, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, राजु कांबळे, मनोज जाधव, अमोल माने, पोलीस कॉन्स्टेबल धीरज महाडीक, मोसीन मोमीन तसेच चालक विजय निकम, अमृत कर्पे यांनी सहभाग घेतला होता.
Satara District Police, Beed District, IPS Sameer Shaikh
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या