Satara News : 'निमा रन फॉर हेल्थ'ची घोषणा


नोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ; पहिल्याच दिवशी पाचशे फॉर्मचे वितरण

Satara Sports News : सातारा येथील पोलीस कवायत मैदानावर निमा रन फॉर हेल्थ २०२४ च्या तिसऱ्या पर्वाची घोषणा व नोंदणी प्रक्रिया सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे संस्थापक डॉ. संदीप काटे यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. दि. २७ ऑक्टोबर रोजी साताऱ्यात ही स्पर्धा होत आहे. 

या स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. ही रन दहा किलोमीटर व तीन किलोमीटर या दोन मुख्य प्रकारासह वेगवेगळ्या वयोगटात होणार आहे. आजारी पडल्यानंतर डॉक्टर्स रुग्णसेवा नेहमीच करतात. मात्र निमा रन फॉर हेल्थच्या माध्यमातून लोकांनी आजारीच पडू नये, यासाठी देखील डॉक्टर्स प्रयत्न करीत आहेत हे कौतुकास्पद असल्याचे डॉ. काटे यावेळी म्हणाले. जास्तीत जास्त लोकांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

नोंदणी प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद

निमाचे अध्यक्ष डॉ. अनिल शिंगे व निमा रन फॉर हेल्थचे अध्यक्ष डॉ. सुधीर पवार यांनी स्पर्धेविषयी उपस्थितांना माहिती दिली. याठिकाणी उपस्थित धावपटूंनी नोंदणी प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे पहिल्या दिवशीच पाचशे नोंदणी फॉर्म्सचे वितरण झाले.

यावेळी डॉ. दीपक बनकर, पंकज नागोरी, डॉ. देवदत्त देव, डॉ. अश्विनी देव, डॉ. कैलास खडतरे, डॉ. दीपक थोरात यांच्यासह सातारा हील मॅरेथॉनचे सर्वच आयोजक तसेच निमाचे खजिनदार डॉ. सुधाकर लाड, डॉ. अभिराम पेंढारकर, निमा रन फॉर हेल्थचे रेस डायरेक्टर डॉ. दयानंद घाडगे, रेस सेक्रेटरी डॉ. शुभांगी गायकवाड, रेस कोऑर्डीनेटर डॉ. सुनिता चव्हाण व साताऱ्यातील धावपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या