साताऱ्यात ६ जुलै रोजी कार्यशाळा; अध:पतन टाळण्याच्या हेतूने आयोजन
Satara News : सातारा शहरामध्ये प्रथमच शनिवार दि. ६ जुलै रोजी 'मोबाईल, मुलं ...आणि आपण' ही एक अभिनव कार्यशाळा होत आहे. सातारा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महिला शाखेने ही कार्यशाळा आयोजित केली असून आयएमएच्या सभागृहात ही कार्यशाळा होणार आहे.
मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या व्यक्तिमत्वावर खोलवर दुष्परिणाम होत आहेत. मुले पॉर्न क्राईम (लैंगिक गुन्हे) किंवा आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकत आहेत. पालकांना अंधारात ठेवून किंवा त्यांना न जुमानता मोबाईलच्या अतिवापरातून मुलांच्या आयुष्याला, भविष्याला हानी पोहोचत आहे.
पालकांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
या पार्श्वभूमीवर या विषयासंबंधी पालकांना मार्गदर्शन करता यावे आणि मुलांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी उपायांची माहिती देता यावी म्हणून ही कार्यशाळा आयोजित करण्यात येत असून या कार्यशाळेत पुण्याचे प्रसिद्ध बालमानसोपचार तज्ञ डॉ. भूषण शुक्ल आणि सायबर सिक्युरिटी तज्ञ जय गायकवाड हे मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमासाठी पूर्वनोंदणी आवश्यक
सातारकर पालकांनी या कार्यशाळेचा अधिकाधिक लाभ घ्यावा,असे आवाहन आयएमएच्या महिला शाखेच्या अध्यक्षा, मानसोपचारतज्ञ डॉ. राजश्री देशपांडे यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून प्रवेश मर्यादित आहेत. अधिक माहितीसाठी डॉ. राजश्री देशपांडे 9422400170, डॉ. रेश्मा राजभोई 8698980495, डॉ. राजश्री ठोके 9028466661 या मोबाईलवर व्हॉट्सॲपला मेसेज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या