Satara News : मान्याचीवाडी ‘सौरग्राम’ होणार


विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी घराघरावर सौरऊर्जा संच बसवणार 

Mahavitaran News : पाटण तालुक्यातील आदर्शगाव असलेले मान्याचीवाडी आता लवकरच सौरग्राम म्हणून ओळखले जाणार आहे. मंगळवारी (दि. २५) झालेल्या ग्रामसभेत मान्याचीवाडीने 'प्रधानमंत्री सूर्यघर - मुफ्त बिजली योजने'चा लाभ घेत सर्व घरांच्या छतावर सौरऊर्जा संच बसविण्याचा व विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचा निर्धार केला आहे.

महावितरण बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांच्या उपस्थितीत ही ग्रामसभा झाली. ग्रामसभेत पावडे यांनी अपारंपरिक ऊर्जेचे व सूर्यघर योजनेचे महत्व आणि त्याकरिता केंद्र सरकारकडून मिळणार्‍या ७८ हजार रुपयांच्या अनुदानाबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यानंतर गावातील १०२ वीज ग्राहकांनी प्रधानमंत्री सूर्यघर - मुफ्त बिजली योजनेसाठी नावनोंदणी केली. ग्रामसभेला सूर्यघर योजनेत काम करणार्‍या ठेकेदारांनीही सहभाग नोंदवला.

कामे युद्धपातळीवर करण्याच्या सूचना 

मुख्य अभियंता पावडे यांनी सर्व सहभागी ग्राहकांचे व त्यांना प्रेरणा देणार्‍या सरपंच रवींद्र माने यांचे याप्रसंगी अभिनंदन केले. ठेकेदारांना सूर्यघर योजनेची कामे युद्धपातळीवर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच ‘एक दिवस, एक गाव’ उपक्रम राबवून मान्याचीवाडी गावातील सर्व वीज यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीची कामे करण्याचेही निर्देश दिले. 

ग्रामसभेला सरपंच रवींद्र माने, मुख्य अभियंता सुनिल पावडे, प्रभारी अधीक्षक अभियंता अमित बारटक्के, कराडचे कार्यकारी अभियंता रवींद्र बुंदेले, उपकार्यकारी अभिंयता चेतन कुंभार, अमित आदमाने, सहाय्यक अभियंता अमोल देसाई व धनंजय शेडे, कनिष्ठ अभियंता सागर यादव, वीज कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पर्यारवणपूरक उपक्रमात कायम आघाडी

मान्याचीवाडी या गावाने अनेक लोकोपयोगी व पर्यारवणपूरक उपक्रम राबविण्यात कायम आघाडी ठेवली आहे. यापूर्वी मान्याचीवाडीने महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेचा लाभ घेतला आहे. या गावात छापील वीजबिल आता कालबाह्य झाले असून, सर्वांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेलवर व मोबाईलवर वीजबिले मिळतात. तसेच ही बिले ऑनलाईन भरण्यावरच त्यांचा भर असतो. त्यासाठी त्यांना प्रत्येक बिलामागे दहा रुपयांची सूट मिळत आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या