Satara News : वाई अर्बन बँकेस आठवलेंची भेट


वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देत सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन

Satara News : वाई व परिसरांतील विविध क्षेत्रांतील सन्माननीय सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या व १०३ वर्षांची मोठी परंपरा असलेल्या दि वाई अर्बन को - ऑपरेटिव्ह बँकेस केंद्र शासनाच्या स्तरावर सर्व ते सहकार्य करण्यात येईल, असे अभिवचन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिले. 

बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त आठवले यांनी वाईतील प्रधान कार्यालयास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी बँकेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात मंत्री महोदय बोलत होते. बँकेचे अध्यक्ष अनिल देव, उपाध्यक्ष डॉ. शेखर कांबळे यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी आठवले यांनी बँकेच्या गौरवानिमित्त आपल्या खुमासदार शैलीत चारोळी सादर केली. त्यास उपस्थितांनी दाद दिली. बँकिंग कामकाज करताना येणाऱ्या अडीअडचणी व त्याबाबतच्या उपाययोजना यांची माहिती घेतली. बँकेला केंद्र शासन स्तरावर काही मदत हवी असल्यास किंवा काही समस्या असतील तर त्यांचे निराकरण केले जाईल. बँकेच्या कोणत्याही कामामध्ये आपण स्वतः लक्ष पुरवू व लागेल ती मदत देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

बँकेचे अध्यक्ष अनिल देव यांनी मान्यवरांचे स्वागत केले. उपाध्यक्ष डाँ. शेखर कांबळे यांनी प्रास्ताविकात रामदास आठवले यांच्याबाबतच्या आठवणी सांगितल्या. याप्रसंगी बँकेचे माजी अध्यक्ष अरूण देव, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, भूषण गायकवाड व रिपाईंचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. दिवसभरांत बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. विनय जोगळेकर, सतीश शेंडे, डॉ. मधुसूदन मुजुमदार, मिलिंद भंडारे, ॲड. प्रतापराव शिंदे, सुनील शिंदे, विद्याधर तावरे, प्रा. विष्णू खरे, मनोज खटावकर, प्रा. किशोर अभ्यंकर, नरहरी महाबळेश्वरकर यांच्यासह वाई शहर व सातारा जिल्ह्यातील मान्यवरांनी बँकेस भेट देऊन वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. 

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या