Satara News : 'अक्षरगौरव'साठी साहित्यकृती पाठवा


भास्करराव ग. माने स्मृत्यर्थ राज्यस्तरीय पुरस्कार; अश्वमेध ग्रंथालयाचे आवाहन

Satara News : सातारा येथील अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय या ग्रंथालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय अक्षरगौरव पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठवण्याचे आवाहन ग्रंथालयाचे संस्थापक रवींद्र भारती - झुटिंग व कार्याध्यक्ष साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांनी केले आहे.

ग्रंथालयाच्या वतीने वाचन संस्कृती समाजात रुजावी व वाढीस लागावी म्हणून वेगवेगळे साहित्यिक उपक्रम, व्याख्याने व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून लेखकांना प्रोत्साहन, प्रेरणा व बळ मिळावे या हेतूने उत्कृष्ट साहित्यकृतींना राज्यस्तरीय कै. भास्करराव ग. माने स्मृत्यर्थ राज्यस्तरीय ‘अक्षरगौरव पुरस्कार’ देण्यात येतो. पुरस्कारांचे हे १३ वे वर्ष आहे. 

डॉ. कारखानीस स्मृत्यर्थही पुरस्कार 

यावर्षी जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या वर्षातील प्रकाशित दोन उत्कृष्ट साहित्यकृतींना राज्यस्तरीय ‘अक्षर गौरव साहित्य पुरस्कार २०२३’ हा पुरस्कार देण्यात येणार असून, या पुरस्काराचे स्वरूप अडिच हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे. सातारा जिल्ह्यातील दोन लेखकांना 'अक्षरगौरव साहित्य विशेष पुरस्कार २०२३' तर आरोग्य विषयक ग्रंथासाठी डॉ. श्रीकांत कारखानीस स्मृत्यर्थ देखील पुरस्कार देण्यात येणार असून पुरस्काराचे स्वरूप एक हजार रुपये रोख स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे. साहित्य क्षेत्रातील जाणकार निवड समितीकडून या साहित्यकृतींची निवड केली जाईल. 

तरी या पुरस्कारासाठी लेखक व प्रकाशकांनी आपल्या साहित्यकृतीच्या दोन प्रती अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय, २५२, सोमवार पेठ, स्नेहल अपार्टमेंट, दत्तमंदिर चौक, सातारा या पत्त्यावर १५ जुलैपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या