Satara News : सातार्‍यात वार्षिक भजन महोत्सव


नटराज मंदिरात पाच दिवस आयोजन; विविध धार्मिक - सामाजिक उपक्रम 

Satara News : सातारा येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात बुधवार दि. २६ पासून रविवार दि. ३० पर्यंत होणार्‍या वार्षिक भजन मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे. या मेळाव्याला येणार्‍या भाविकांसाठी पावसापासून संरक्षण होणारा भव्य सभामंडप तयार करण्यात आला असून सलग पाच दिवस अल्पोपहारासह दोन वेळ मोफत अन्नदान केले जाणार आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

चेन्नई येथील भगवंत नाम प्रचार मंडळीच्या वतीने २१ वा वार्षिक भजन महोत्सव सातार्‍यात होत आहे. त्या संदर्भात माहिती देण्यासाठी मंदिरात पत्रकार परिषद झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष व स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी सहाय्यक महाव्यवस्थापक गोपी भागवत, श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश शानभाग, वेदमूर्ती जगदीशशास्त्री भट, नारायण राव आदी उपस्थित होते.

मंदिर परिसरात विद्युत रोषणाई  

श्री कांची कामकोटी मुलम्यान सर्वज्ञ पीठम, कांचीपुरुमचे प पू शंकराचार्य, श्री श्री श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामीजी, प पू श्री श्री श्री जयेंद्र सरस्वती स्वामीजी व विद्यमान पीठाधीश्वर प पू श्री श्री श्री शंकरविजयेंद्र सरस्वती स्वामीजी यांच्या कृपाशीर्वादाने हा मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी मंदिरात व मंदिराबाहेर पावसापासून संरक्षण होणारा भव्य सभामंडप उभारण्यात आला आहे. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिरामधील सभामंडपामध्ये दररोज भजनसेवा होईल. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन व जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह विविध मान्यवर मेळाव्यात भेट देणार आहेत. 

दि. २८ रोजी महारुद्र अनुष्ठानाची सांगता

दरम्यान, या मेळाव्यात सकाळी सात ते दुपारी एक तसेच संध्याकाळी तीन ते रात्री साडेआठ या वेळेत ज्येष्ठ भागवतकारांकडून भजनसेवा होईल. दि. २६ ते २८ जूनदरम्यान सकाळी सात ते दुपारी एक या कालावधीत महारुद्र अनुष्ठान होणार आहे. दि. २८ जून रोजी महारुद्र अनुष्ठानाची होम-हवनाने सांगता होईल. दि. ३० जून रोजी श्री राधा कृष्ण कल्याणम (लग्न सोहळा) व प पू शंकराचार्य, श्री श्री श्री महास्वामी चंद्रशेखरेंद्र सरस्वती स्वामीजींच्या पादुकांना पुष्प लक्षार्चना नियोजित आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या