चेअरमनपदी अमोल मोहिते, व्हाईस चेअरमनपदी विजय बडेकर यांची फेरनिवड
Satara News : सातारा येथील जनता सहकारी बँकेच्या चेअरमनपदी अमोल मोहिते, व्हाईस चेअरमनपदी विजय बडेकर यांची पुढील एक वर्षासाठी बिनविरोध फेरनिवड करण्यात आल्याची माहिती बँकेचे भागधारक पॅनेलप्रमुख, ज्येष्ठ संचालक, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन विनोद कुलकर्णी यांनी दिली.
चालू आर्थिक वर्षात बँकेचे कार्यक्षेत्र वाढवणे, ग्राहकांसाठी मोबाईल बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणे ही दोन महत्वाची उद्दिष्टे बँक व्यवस्थापनाने निश्चित केली असून, त्यादृष्टीने कामकाज देखील सुरू केले आहे असे विनोद कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.
विश्वास सार्थ ठरवणार - मोहिते
याप्रसंगी अमोल मोहिते यांचा विनोद कुलकर्णी यांच्या हस्ते, तर विजय बडेकर यांचा ज्येष्ठ संचालक वसंत लेवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एकमताने फेरनिवड केल्याबद्दल अमोल मोहिते, विजय बडेकर यांनी सर्वांचे आभार मानले. आमच्यावर सोपविलेली जबाबदारी व विश्वास सार्थ ठरवू अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी ज्येष्ठ संचालक जयवंत भोसले, आनंदराव कणसे, जयेंद्र चव्हाण, अशोक मोने, माधव सारडा, डॉ. चेतना माजगांवकर, सुजाता राजेमहाडीक, चंद्रशेखर घोडके, बाळासाहेब गोसावी, अविनाश बाचल, वसंत लेवे, रामचंद्र साठे, रवींद्र माने, वजीर नदाफ, नारायण लोहार, मच्छिंद्र जगदाळे, ॲड. चंद्रकांत बेबले, अक्षय गवळी उपस्थित होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या