Mahavitaran News : १.५८ कोटींचा अनधिकृत वीज वापर

पश्चिम महाराष्ट्रात महावितरणकडून वीजचोरीविरोधी विशेष मोहीम

Mahavitaran News : महावितरणकडून वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात वीजचोरीविरोधी नुकतीच एकदिवसीय विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ११५२ ठिकाणी सुमारे १ कोटी ५८ लाख रुपयांच्या अनधिकृत वीज वापराचे प्रकार उघडकीस आले. यामध्ये वीजतारेच्या हुकद्वारे किंवा मीटरमध्ये फेरफार करून ८९६ ठिकाणी ९९ लाख ९८ हजार रुपयांची थेट वीजचोरी झाल्याचे आढळून आले.

पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात आली. त्याप्रमाणे सर्वच जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी या मोहिमेला सुरूवात झाली व सायंकाळी उशिरापर्यंत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आदी वर्गवारीतील वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली.

वीजचोरीचे ८९६ प्रकार उघड

यामध्ये ज्या उद्देशासाठी वीजजोडणी घेतली त्याऐवजी वाणिज्यिक व इतर कारणांसाठी वापर सुरु असलेले २५६ प्रकार उघडकीस आले असून त्यांना कलम १२६ नुसार दंड, व्याजासह ५८ लाख १९ हजार रुपयांचे वीजबिल देण्यात आले आहे. तसेच थेट चोरीद्वारे विजेचा वापर होणारे ८९६ प्रकार या मोहिमेत उघड झाले. त्यांना कलम १३५ नुसार वीजचोरीप्रकरणी दंड व वीजवापराचे ९९ लाख ९८ हजार रुपयांचे बिल देण्यात आले आहे. या दोन्ही कलमांनुसार (कंसात रक्कम) पुणे जिल्हा ६६२ (१ कोटी २८ लाख ८५ हजार), सातारा ७८ (५ लाख ८४ हजार), सोलापूर २२३ (१२ लाख ५७ हजार), कोल्हापूर ६९ (१ लाख ४८ हजार) व सांगली जिल्ह्यात १२० (९ लाख ४३ हजार) अशा एकूण ११५२ ठिकाणी १ कोटी ५८ लाख १७ हजार रुपयांचा अनधिकृतपणे वीजवापर उघडकीस आला.

दोन वर्षांत ८१ कोटींची वीजचोरी

पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी वीजचोरीविरुद्ध पश्चिम महाराष्ट्रात एकाच वेळी महिन्यातून एक दिवस विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार गेल्या दोन वर्षांमध्ये पाचही जिल्ह्यात एकूण २३ हजार ५१८ ठिकाणी ८० कोटी ७१ लाख रुपयांच्या वीजचोर्‍या उघडकीस आल्या आहेत. यात सन २०२२-२३ मध्ये ४४ कोटी ३१ लाख आणि सन २०२३-२४ मध्ये ३६ कोटी ४० लाख रुपयांच्या वीजचोर्‍या उघड केल्या आहेत. तर १०७ ठिकाणी संबंधित वीजचोरांविरुद्ध कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई करण्यात आली आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या