भारत, जपानसह आशियायी देशांत एलपीजी जेनसेट्स उपलब्ध करून देणार
Satara News : भारतासह जपान आणि इतर आशियायी देशांत CPCBIV+ प्रमाणित एलपीजी जेनसेट्स उपलब्ध करून देण्यासाठी सातारा येथील कूपर कॉर्पोरेशन आणि जपानमधील सिंफोनिया टेक्नोलॉजी ही बहुराष्ट्रीय कंपनी यांच्यात करार करण्यात आला आहे.
कूपर कॉर्पोरेशन या महाराष्ट्रातील आघाडीच्या आणि इंजिन, इंजिनचे सुटे भाग व जनरेटर उत्पादक कंपनीचा सिंफोनिया टेक्नोलॉजी या हरित वाहतूक उपकरणे, उर्जा नियंत्रण आणि एयरोस्पेस तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीसह भागिदारी करार होणे ही सातारच्या औद्योगिक जगतासाठी महत्त्वपूर्ण बाब ठरली आहे.
शाश्वत उर्जा सुविधेसाठी महत्त्वाचा टप्पा
या ऐतिहासिक भागिदारीमुळे शाश्वत उर्जा सुविधा तयार करण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा नोंदवला गेला आहे. कारण कूपर कॉर्पोरेशनने सिंफोनिया टेक्नोलॉजीसह भागिदारीत तयार केलेला देशातील अशाप्रकारचा पहिलाच १० केव्हीए एलपीजी CPCBIV+ प्रमाणित जेनसेट उपलब्ध करण्यात आला आहे. CPCBIV+ ने देशात घालून दिलेल्या कठोर उत्सर्जन निकषांचे पालन करत तयार केलेला हा जेनसेट शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याच्या दिशेने मोठी झेप घेणारा असून त्यामुळे हरित उर्जा निर्मिती क्षेत्रात नवीन युगाची सुरुवात होईल.
कूपर सिंफोनिया जेनसेट मॉडेल नाव CSG-0010L-IN आणि त्याचे हिंदुस्थानातील ब्रँड नाव 'DAIMON' असेल. सिंफोनिया कंपनी जेथे आहे, त्या शहराचे हे नाव आहे. हेच उत्पादन जपानमध्ये कूपर कॉर्पोरेशन गेल्या १०० वर्षांपासून कार्यरत असलेल्या शहराच्या नावावरून, अर्थातच 'सातारा' नावाने उपलब्ध केले जाईल.
दर्जेदार व किफायतशीर पर्याय
या जेनसेटमुळे ग्राहकांना विविध प्रकारचे लाभ, गुणवत्तापूर्ण कामगिरी, वाजवीपणा आणि विश्वासार्हता मिळेल. याचे उत्सर्जन मर्यादित असून ते चालवण्यासाठी येणारा कमी खर्च व सोपी देखभाल यामुळे हे उत्पादन पारंपरिक डिझेल जेनसेट्स आणि ग्रिड पॉवरच्या तुलनेत दर्जेदार आणि किफायतशीर पर्याय ठरेल. इतर उर्जा स्त्रोतांच्या तुलनेत एलपीजी पर्यावरणावर कमीत कमी परिणाम आणि जास्त कार्यक्षमतेसह हरित आणि शाश्वत इंधन पर्याय म्हणून वेगळा ठरतो.
निर्यातीचा वाटा अंदाजे ५० टक्के
सिंफोनिया कंपनीची सन २०२१ वर्षअखेर उलाढाल ९४.५ बिलियन येन होती. १९१७ मध्ये स्थापन झालेल्या या १०० वर्ष जुन्या कंपनीने विविध व्यावसायिक विभागांमध्ये प्रवेश केला आहे. त्यात ऑटोमोटिव्ह टेस्टिंग यंत्रणा आणि सुटे भाग, एयरोस्पेस, व्यावसायिक वाहने, औद्योगिक रोबोट्स, कंट्रोलर्स, प्रिंटर यंत्रणा, क्लच आणि ब्रेक्स, रिजनरेटिंग मेडिसिन्स आणि शेती यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे कूपर कॉर्पोरेशन ही सुद्धा सुटे भाग, डिझेल व गॅस इंजिन्स उत्पादन क्षेत्रातील १०० वर्ष जुनी कंपनी आहे. कंपनीचे १३ कारखाने कार्यरत असून ते सर्व सातार्यात आहेत. कंपनीतील ४०० पेक्षा जास्त कर्मचारी ४० वर्षांपासून काम करत आहेत. कूपर कॉर्पोरेशनच्या व्यावसायिक उत्पन्नात निर्यातीचा वाटा अंदाजे ५० टक्के असून आतापर्यंतची एकूण निर्यात १० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या