Satara News : सातार्‍यात शिवसेनेचा रस्ता रोको



रिक्षाचालकांच्या मनमानीविरोधात आंदोलन; लूट होऊ देणार नाही - मोहिते

Satara News : सातारा शहरात मनमानी करून प्रवाशांची लूट करणार्‍या रिक्षा चालकांच्या विरोधात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आज मुख्य बसस्थानक परिसरात तीव्र रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. प्रवासी नागरिकांची सातार्‍यात लूट होऊ देणार नाही असे सचिन मोहिते यांनी याप्रसंगी बजावले.

सातारा शहरात, प्रामुख्याने बसस्थानक परिसरात काही रिक्षा चालकांची मनमानी सुरू असून प्रवाशांची मोठ्या स्वरूपात लूट सुरू आहे. या परिसरात काही रिक्षा चालकांची गुंडगिरीसुध्दा बरेचदा दिसून आली आहे. शिवाय मीटरप्रमाणे व्यवसाय न करता मनमानी पद्धतीने भाडे आकारणे, काहीवेळ तर दारू पिवून वाहन चालविणे, छोटी भाडे नाकारणे, अडवणूक करून भाडे वसूल करणे, रिक्षा अस्ताव्यस्त लावणे, मर्यादेपेक्षा जास्त गाड्या लावणे, मर्यादेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणे, गणवेश न घालणे, बॅच न लावणे अशा अनेक तक्रारी रिक्षा चालकांच्या संबंधात आहेत. परंतु वाहतूक विभाग व आरटीओ विभाग त्यांच्या विरोधात थातुरमातुर कारवाई करून चिरीमिरीवर समाधान मानत असल्याचे बर्‍याचदा उघड होऊनही वरिष्ठ अधिकारी मूग गिळून बसले आहेत. याबाबतीत आरटीओ कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी वारंवार संपर्क करूनदेखील काहीच हालचाल होत नसल्याने हे आंदोलन करण्यात आल्याचे मोहिते यांनी सांगितले.

लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन

आंदोलनात तालुकाप्रमुख सागर रायते, सुनील पवार, सादिक बागवान, रूपेश वंजारी, प्रणव सावंत, शिवराज टोणपे, रवींद्र भणगे, अमोल गोसावी, हरी पवार, इम्रान बागवान, सचिन जगताप, आतिश ननावरे, पप्पू ननावरे, आझाद शेख, निलेश चव्हाण, सुनील मोहिते, सनी बसवंत, अक्षय धोंडे, किशोर घोरपडे, किशोर साळुंखे, संदीप मोहिते, मिथुन जाधव, अक्षय जानकर आदी पदाधिकारी - शिवसैनिक सहभागी झाले होते. लवकरच या बाबतीत संबधित सर्व विभागांची बैठक लावून निर्णय घेऊ असे सांगितल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या