Satara News : मनीषा शिरटावलेना नारायण सुर्वे पुरस्कार


सिंधुदुर्गातील मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे निवड; ऑगस्टमध्ये वितरण

Satara News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे देण्यात येणार्‍या कविवर्य नारायण सुर्वे पुरस्कारासाठी सातारा येथील कवयित्री मनीषा शिरटावले यांची, तर कविवर्य वसंत सावंत काव्य पुरस्कारासाठी वर्धा येथील कवी आशिष वरघणे यांची निवड करण्यात आली आहे.

ट्रस्टतर्पेâ या वर्षापासून कविवर्य नारायण सुर्वे आणि कविवर्य वसंत सावंत यांच्या नावाचे काव्य पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत. या पुरस्कारांसाठी प्रत्येक कवीकडून पाच कविता मागविण्यात आल्या होत्या. या योजनेला राज्याच्या विविध भागातून कवींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावर्षीच्या या उपक्रमासाठी आलेल्या कवितांमधून कवितेच्या गुणवत्तेचे निकष लावत परीक्षक, कणकवली कॉलेजच्या मराठी विभाग प्रमुख प्रा. सीमा हडकर यांनी मनीषा शिरटावले, आशिष वरघणे यांची पुरस्कारांसाठी निवड केली आहे. १५०० रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर यांनी दिली. दरम्यान, पुरस्कार वितरण समारंभ नांदगाव येथे ऑगस्टमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या