Satara News : तारगावात महापुरुषांना अभिवादन


'घराघरात शिवजयंती' उपक्रमांतर्गत मलवडकर कुटुंबीयांकडून उत्सव साजरा

Satara News : क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले शिवजयंतीचे प्रणेते आहेत. त्यामुळे भिडेवाडाकार फुलेप्रेमी, फुले फेस्टिवलचे आयोजक विजय वडवेराव यांच्या मार्गदर्शनाखाली घराघरात शिवजयंती - मनामनात शिवजयंती उपक्रम सर्वत्र राबविण्यात आला. 

या उपक्रमांतर्गत तारगाव (जि. सातारा) येथील फुलप्रेमी कवयित्री सौ. विद्याराणी मलवडकर आणि कुटुंबीयांकडून छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच क्रांतीसूर्य जोतिराव फुले यांनाही अभिवादन करण्यात आले.


इतिहास सर्वांपर्यंत पोहोचावा हा उद्देश
 

क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांनी रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. त्यांनीच शिवजयंती प्रथम साजरी केली. 1869 साली पहिली शिवजयंती साजरी करण्यात आली. जोतिराव फुले हयात होते, तोपर्यंत ही शिवजयंती दहा दिवस साजरी करण्यात येत होती. हा इतिहास  सर्वांपर्यंत पोहोचावा हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

उत्सव सर्वत्र उत्साहाने साजरा

विजय वडवेराव यांच्या मार्गदर्शनाखाली हा शिवजयंती उत्सव प्रत्येकाने घरात, शाळेतल्या शिक्षकांनी शाळेत, संस्थांनी संस्थेत उत्साहाने साजरा केला.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या