Satara News : बाबासाहेबांच्या विचारांचे विद्यापीठ


सतीश कुलकर्णी यांच्या जीवनकार्याची उत्तम कांबळे यांच्याकडून प्रशंसा

Satara News : भीममय आयुष्य जगणाऱ्या वाईच्या सतीश कुलकर्णी यांनी बाबासाहेबांच्या जगाशी स्वतःला जोडलं. बाबासाहेब यांच्यावरील साहित्याचा प्रचंड संग्रह त्यांनी केला असला तरी अख्खं साहित्य आणि ग्रंथालय त्यांच्या डोक्यातही आहे. बाबासाहेबांच्या विचारांचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे सतीश कुलकर्णी, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार व विचारवंत उत्तम कांबळे यांनी काढले. 

भोर येथील फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसारक मंडळाच्या वतीने दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्कार वाई येथील सतीश कुलकर्णी यांना नुकताच प्रदान करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात हा पुरस्कार प्रदान सोहळा झाला. दहा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच नवी दिल्लीस्थित विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांना राष्ट्रीय कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पंचवीस हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. 

कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती 

कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, माजी ऊर्जा मंत्री आमदार नितीन राऊत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष डॉ. सुनील धिवार, फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सागर कांबळे, योगेश कांबळे, संतोष मदने, सतीश वाघमारे व्यासपीठावर उपस्थित होते. 

बाबासाहेब हे आमचे गुरुकुल

सत्काराला उत्तर देताना सतीश कुलकर्णी म्हणाले, बाबासाहेब हे आमचे गुरुकुल आहे. या गुरुकुलाचा मी एक स्नातक आहे. मला मिळालेला हा सन्मान बाबासाहेबांच्या प्रेरणेचा सन्मान आहे. माझे आयुष्य भीममय आहेच, पण ते अधिक भीममय करण्यासाठी ज्या असंख्य चाहत्यांनी, मित्रांनी, संस्थांनी, मंडळांनी मला उत्तेजन दिले त्यात भोरच्या ‘फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळा’चे स्थान अग्रस्थानी आहे. आंबेडकरी समाज हा प्रेमळ समाज आहे. या आंबेडकरी समाजाने मला हरवलेले, न सापडलेले, माहीत नसलेले असे अनेक नातेवाईक दिले. भारताचे किंबहुना जगाचे कल्याण करणारे सारभूत तत्वज्ञान म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. नवे जग निर्माण करणारे, नवे विश्व निर्माण करणारे कोण असतील तर ते बाबासाहेब. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान सतत डोळ्यापुढे ठेवले तर समाज पुढे जाईल आणि लोकशाही बळकट होईल.

बाबासाहेबांच्या वचनाचा पुन्हा 

नव्याने विचार करण्याची गरज

डॉ. सुखदेव थोरात यांनी आपल्या भाषणात संपूर्ण भारतात आणि मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात  झालेल्या जातिअंताच्या लढ्याचा सूक्ष्म इतिहास मांडला. प्रबुद्ध भारतासाठी बाबासाहेबांच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या वचनाचा पुन्हा नव्याने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. 

फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रोहिदास जाधव यांनी प्रास्ताविक केले. सागर कांबळे आणि योगेश कांबळे यांनी मानपत्र वाचन केले. कार्यक्रमाला आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते, पदाधिकारी, विद्यापीठाचे प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या