संघटना बांधणीसह अडचणी जाणून घेणार; 24 रोजी साताऱ्यात मेळावा
Satara News : सातारा जिल्ह्यातील संघटना मजबूत बांधणी, शिवकार्य सदस्य नोंदणी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवार चाचपणी आणि शिवसैनिकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे मांडण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव दि. २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत सातारा जिल्हा दौरा करणार आहेत.
शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई आणि संपर्कप्रमुख शरद कणसे यांच्या सूचनेनुसार हा जिल्हा दौरा आखण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दि. २४ रोजी साताऱ्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती चंद्रकांत जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
जिल्ह्यात शुक्रवारपासून दौरा
नियोजित दौरा शुक्रवार दि. २१ फेब्रुवारीस सुरू होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता मेढा (विश्रामगृह, मेढा), दुपारी साडेबारा वाजता महाबळेश्वर (विश्रामगृह, महाबळेश्वर), दुपारी तीन वाजता खंडाळा (विश्रामगृह, खंडाळा), सायंकाळी पाच वाजता लोणंद (विश्रामगृह, लोणंद), रात्री फलटण राखीव व मुक्काम. शनिवार दि. २२ रोजी सकाळी दहा वाजता फलटण (फलटण, विश्रामगृह), दुपारी एक वाजता दहिवडी (दहिवडी, विश्रामगृह), सायंकाळी चार वाजता म्हसवड (म्हसवड, विश्रामगृह), सायंकाळी सहा वाजता वडूज (वडूज, विश्रामगृह), रात्री वडूज राखीव व मुक्काम. रविवार दि. २३ रोजी सकाळी दहा वाजता औंध (विश्रामगृह, औंध ), दुपारी बारा वाजता मसूर, दुपारी तीन वाजता कराड (कराड विश्रामगृह), सायंकाळी पाच वाजता ढेबेवाडी, सायंकाळी सात वाजता पाटण (विश्रामगृह, पाटण) याप्रमाणे या दौऱ्याचे नियोजन आहे. सोमवार दि. २४ रोजी संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा सातारा येथे होणार आहे.
या दौऱ्यात सातारा जिल्हा सहसंपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, वासुदेव माने, सैनिक आघाडीचे जिल्हाप्रमुख निलेश निकम, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शारदाताई जाधव, उपजिल्हाप्रमुख सुलोचनाताई पवार, सातारा शहर प्रमुख निलेश मोरे, कार्यालयप्रमुख विजयराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
पदाधिकारी - शिवसेनिकांना आवाहन
या दौऱ्यात सर्व उपजिल्हाप्रमुख, विधानसभा संघटक, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, शहरसंघटक, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख पुरुष/महिला, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, सर्व शासकीय कमिटी सदस्य व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी केले आहे.
Deputy Chief Minister Eknath Shinde, Minister Shambhuraj Desai, Sharad Kanase, Satara district program
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या