Satara News : लोणंदमध्ये पूर्ववैमनस्यातून खून


आरोपी एका तासात जेरबंद; लोणंद पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Satara Crime News : पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून एकाचा लाकडी फळकुटाने डोक्यात मारून तसेच चाकूने भोसकून निर्घृण खून केल्याची घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास खंडाळा तालुक्यातील इंदिरानगर (लोणंद) हद्दीत बिरोबा मंदिरात घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, लोणंद पोलिसांनी एका तासातच खून प्रकरणातील आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले. 

किरण किसन गोवेकर (रा. कोरेगाव, ता. फलटण, जि. सातारा) असे मृताचे नाव आहे. तर सतिश भाऊसो काळे व रोहित शिवाजी डेंगरे (दोघेही रा. इंदिरानगर, लोणंद, ता. खंडाळा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. 

खून करून आरोपी फरार

इंदिरानगर येथील बिरोबा मंदिराचे पुजारी अनिल कोळेकर हे दुपारी मंदिरात आराम करण्यासाठी आले असता त्यांना त्याठिकाणी किरण गोवेकर हा रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. तसेच खून करून आरोपी फरार झाले होते. कोळेकर यांनी याबाबत लोणंद पोलिसांना कळवल्यानंतर लोणंद पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

एका तासात आरोपी ताब्यात

दरम्यान, या प्रकरणातील आरोपींना तातडीने शोधून काढण्याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख तसेच अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम, ज्योती चव्हाण, पोलीस हवालदार चंद्रकांत काकडे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कोळेकर यांनी आरोपींची माहिती घेऊन त्यांना गुन्हा घडल्यापासून एक तासाच्या आत लोणंद येथून ताब्यात घेतले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या