Satara News : कोकाटे यांची हकालपट्टी करा


शेतकऱ्याचा अपमान करणाऱ्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही

Satara News : जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याबद्दल मुखातून गटारगंगा ओकणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी शिवसेना उपनेत्या छायाताई शिंदे यांनी केली आहे.

या संदर्भात त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, की राज्यातील महायुती शासन शेतकरी विरोधी असून शेतकऱ्यांचा अपमान करण्याचे धोरण सरकारमधील नेत्यांकडून राबवले जात आहे. शेतकरी, कष्टकरी यांच्याबद्दल यांच्या पोटात जे आहे तेच ओठावर आले आहे. अशा राज्यकर्त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही.

यांनीच शब्द दिला होता 

कोकाटे यांनी शेतकरी कर्जमाफीचे पैसे साखरपुडा आणि लग्नात खर्च करतो अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करून शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. कर्जमाफी देणार नसाल तर मंत्रिमंडळातून बाहेर पडा. कारण निवडणुकीआधी याच लोकांनी मतांची भीक मागताना शेतकरी कर्जमाफी करू असा शब्द दिला होता. आता, मी बोललो नाही. शेतकऱ्यांना कर्जे भरावीच लागतील असे अर्थमंत्री अजित पवार म्हणतात. शिवसेनेच्या वतीने आम्ही सांगतो दादा तुम्हाला कर्जमाफी करावीच लागेल. बोलला तसे चाला. अन्यथा फसवणाऱ्या महायुतीला शेतकरी नक्कीच पायाखाली घेतल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी ठणकावले.

शेतकऱ्याच्या कष्टावर देश चालतो

शेतकरी देशाचा कणा आहे. त्याच्या कष्टावर हा देश चालतो हे कोकाटे यांनी विसरू नये. एक तर बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. या शासनाच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी मेठीकुटीला आला आहे. शेतकरी कर्ज जाणीवपूर्वक ठेवत नाही. निसर्गाची साथ न मिळाल्यास शेतकऱ्याचे नुकसान होते आणि त्यामुळे तो पीक कर्ज भरू शकत नाही याची जाणीव कोकाटे यांना नाही असे खडेबोल त्यांनी सुनावले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या