Satara News : वडूजजवळ अपघातात दोन ठार


सहा गंभीर जखमी; मृतांवर औंधमध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार 

Satara News : सातारा जिल्ह्यातील वडूज - दहिवडी रस्त्यावर सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार, तर सहा जण जखमी झाले. मृत्युमुखी पडलेले दोघेही खटाव तालुक्यातील औंध येथील असून त्यांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. आजचा आठवडी बाजार बंद ठेवून गावकऱ्यांनी आपला शोक व्यक्त केला.

शिवम हणमंतराव शिंदे व प्रसाद उर्फ बाबू राजेंद्र सुतार (दोघेही राहणार औंध) अशी मृतांची नावे असून मनोज शंकर रणदिवे, सत्यम राजेंद्र खैरमोडे (दोघेही राहणार औंध), लालासो परशुराम पाटोळे, ज्योती लालासो पाटोळे (रा. दरुज, ता. खटाव), रोहन आप्पासाहेब भिसे, आकाश सोनबा बर्गे (रा. वडूज, ता. खटाव) अशी जखमींची नावे आहेत.


स्वामी समर्थ मंदिरानजीक दुर्घटना

वडूज - दहिवडी रस्त्यावरील स्वामी समर्थ मंदिरानजीक ही दुर्घटना घडली. शिवम शिंदे व प्रसाद सुतार हे सोमवारी रात्री स्विफ्ट (एमएच ०३ डीए ७३५४) कारमधून वडूजहून दहिवडीकडे निघाले होते. प्रसाद सुतार गाडी चालवत होता. रात्री साडेदहाच्या सुमारास स्वामी समर्थ मंदिरानजीक या भरधाव स्विफ्टने पुढे निघालेल्या मारुती ओमनीला (एमएच १४ डीएन २७५८) मागून जोरात धडक दिली. त्यानंतर समोरून वडूजच्या दिशेने येत असलेल्या पिकअप जीपशी (एमएच ११ सीएच ३३४२) स्विफ्ट कारची समोरासमोर जोरदार टक्कर झाली.


जखमींना उपचारासाठी सातारला हलवले
 

या तिहेरी अपघातात स्विफ्ट कारमधील शिवम शिंदे आणि प्रसाद सुतार ठार झाले. तसेच स्विफ्टमधील मनोज शंकर रणदिवे, सत्यम राजेंद्र खैरमोडे, पिकअप जीफमधील लालासो परशुराम पाटोळे, ज्योती लालासो पाटोळे, ओमनीतील रोहन आप्पासाहेब भिसे व आकाश सोनबा बर्गे हे गंभीर जखमी झाले.

अपघाताची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली व जखमींना अधिक उपचारासाठी सातारला पाठवून वाहतूक सुरळीत केली.

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

या अपघातात मरण पावलेला शिवम शिंदे हा औंध शिक्षण मंडळाचे विश्वस्त हणमंतराव शिंदे यांचा मुलगा असून प्रसाद सुतार हा औंध शिक्षण मंडळाचे कर्मचारी राजेंद्र सुतार यांचा मुलगा आहे. दोघेही चांगले मित्र होते. त्यांच्या अपघाती निधनाने औंध गावावर शोककळा पसरली असून आजचा बाजार रद्द करून गावकऱ्यांनी शोक व्यक्त केला. आज सकाळी अकराच्या सुमारास दोघांच्या पार्थिवावर हजारोंच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या