ग्रंथालय पुस्तक संपादन समितीवर निवडीबद्दल अ. भा. शिक्षक संघातर्फे आयोजन
Satara News : जिल्हा परिषदेच्या मसूर (ता. कराड) येथील मुलींच्या प्राथमिक शाळेतील उपशिक्षिका सौ. स्वाती सूर्यकांत बाजारे यांची राज्याच्या ग्रंथालय पुस्तक संपादन समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल व त्यांचा 'चिमणी पाखरं' हा बालकविता संग्रह महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत नुकताच प्रकाशित करण्यात आल्याबद्दल अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णत हिरवळे यांच्या हस्ते हा सत्कार समारंभ झाला. याप्रसंगी संघाचे कराड तालुका अध्यक्ष निरंजन सावंत, तालुका उपाध्यक्ष कृष्णा वाघ, मार्गदर्शक निवासराव जगदाळे, गोरख गिरी, मुलांच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत बाजारे, महिला आघाडीच्या तालुका उपाध्यक्ष प्रफुल्लता गायकवाड व शुभांगी पाटील आदी उपस्थित होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613
0 टिप्पण्या