हरित स्वर्ग निर्माण करण्यासाठी निसर्गप्रेमींची अभेद्य एकजूट
गजानन चेणगे
Satara Story : तापमानाचा पारा ४० अंशावर गेला असताना या डोंगरात वणवा पेटलाय, या ठिकाणी झाडांना कुणीतरी आग लावली आहे अशा बातम्या चोहोबाजूने येत आहेत. मात्र अशावेळी सातारा शहराला लागून असलेल्या चार भिंती टेकडीला विविध प्रकारच्या वनसंपदेने समृद्ध करून तिथे हरित स्वर्ग निर्माण करण्यासाठी साताऱ्यातील निसर्गप्रेमींचा एक समूह अविरत प्रयत्न करत आहे. सर्वांनाच प्रेरणा देईल अशी ही आगळीवेगळी स्फूर्तीगाथा आहे.
सर्वत्र बेसुमार वृक्षतोड सुरू आहे, पर्यावरणाचा ऱ्हास प्रचंड गतीने सुरू आहे. अशा स्थितीत या समूहाने झपाटल्याप्रमाणे सुरू केलेले काम हे इतरांसाठी दिशादर्शक ठरते आहे. या निसर्गप्रेमी ग्रुपचे नाव आहे 'हरित सातारा'. चार भिंती टेकडीवर या समुहाचे काही सदस्य दररोज सकाळी तर काही सदस्य दररोज सायंकाळी श्रमदान करत असतात. हरित साताराने या टेकडीवर पळस, पांगारा, वड , पिंपळ, उंबर, काळा कुडा, कडूलिंब, कांचन, हेळा, जांभूळ, काटेसावर, शिवण, कुसुम्ब असे विविध प्रकारचे जवळपास १५०० वृक्ष लावले आहेत.
मदतीला धावतात असंख्य हात
अनेक निसर्गप्रेमी या समुहाला मदत करत असतात. सातारा शहरातील राजपुरोहित स्वीट्स, चंदूकाका ज्वेल्स व कुणबी समाज संघ यांनी या समूहासाठी ५००० लिटरची एक सिमेंट कांक्रीटची टाकी बांधून दिली असून या टाकीजवळ आता ५ लिटर क्षमतेचे २०० कॅन ठेवलेले आहेत. टेकडीवर फिरायला येणारे अनेक निसर्गप्रेमी आता नित्य नियमाने तेथील रोपांना पाणी घालत असतात. या शिवाय शाळा, कॉलेजेस, वेगवेगळ्या अकॅडेमीमधील विद्यार्थीसुध्दा तिथे येतात आणि श्रमदान करतात. फिरायला येणारे अनेक सातारकर आता तिथे आल्यावर हे सर्व पाहून नकळत या कामात सहभाग देतात. तिथल्या पाच दहा रोपांना पाणी घालूनच पुढे जातात.
श्रमदानात परदेशी पाहुण्यांचाही सहभाग
आज सकाळी साताऱ्यातील क्रेन कंपनीतील अधिकारी वर्ग व स्टाफने तिथे श्रमदान केले. या कंपनीत भेट द्यायला आलेल्या कंपनीच्या आयर्लंड युनिटमधील अधिकारी फील व्हाईट व जॉन हे परदेशी पाहुणेसुद्धा श्रमदानात सहभागी झाले होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613
0 टिप्पण्या