Satara News : एसपी समीर शेख यांची बदली


तुषार दोशी सातारचे नवे पोलीस अधीक्षक; 'उंच भरारी' मुंबईला 

Satara News : राज्य सरकारने आज राज्यातील पोलीस अधीक्षक व पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून त्यामध्ये सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची मुंबईला बदली झाली आहे. त्यांच्या जागी नवे पोलीस अधीक्षक म्हणून तुषार दोशी यांची नियुक्ती झाली आहे. 

ऑक्टोबर २०२२ मध्ये सातारला जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून रुजू झालेल्या समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलीस उपायुक्तपदी बदली झाली आहे. तरुण तडफदार समीर शेख यांनी गुंड आणि गुन्हेगारांवर जरब बसवतानाच उंच भरारी, आपले किल्ले आपली जबाबदारी यासारखे समाजाभिमुख उपक्रम राबवले. रोजगाराच्या अभावातून तरुण गुन्हेगारीकडे वळू नयेत म्हणून त्यांच्या हातांना काम देण्याचे मानवतावादी काम त्यांनी कर्तव्य भावनेतून केले. संवेदनशील कालखंडात त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखली. त्यांनी आपल्या कृतीतून जपलेला सर्वधर्मसमभाव जिल्हावासियांना विशेष भावला.

चंद्रपूरला पहिली पोस्टिंग

त्यांच्या जागी आलेल्या तुषार दोशी यांनी २००१ मध्ये नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना चंद्रपूरला पहिली पोस्टिंग मिळाली होती. सन २०२० मध्ये जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीत झालेल्या लाठीमाराच्या घटनेनंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. नंतर पुण्यात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधीक्षक पदी त्यांची बदली झाली. त्यानंतर त्यांची नियुक्ती पुणे लोहमार्ग येथे करण्यात आली. आता सातारचे जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून ते सूत्रे हाती घेत आहेत.

General transfers of police officers, Maharashtra home department, IPS Sameer Shaikh, IPS Tushar Doshi

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या